Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी मध्यरात्रीच उपोषण सोडलं; चर्चेतून निघाला महत्त्वपूर्ण तोडगा

राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती स्वतः जरांगे यांनी आंदोलकांसमोर दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 07:43 AM
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

Follow Us
Follow Us:

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसले होते. अंतरवाली सराटीमध्ये रखरखत्या उन्हात ना पाण्याचा थेंब, ना डोक्यावर कुठलेही छत, डोक्याला भगवा रुमाल परिधान करून सकाळी दहा वाजता, शेतात बाज टाकून उपोषणाला बसले होते. मात्र, मनोज जरांगे पाटील यांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे.

राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर अनेक प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती स्वतः जरांगे यांनी आंदोलकांसमोर दिली. सरकारसोबत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना जरांगे यांनी मोठं विधान केले. ते म्हणाले, सरकारने ५८ लाख कुणबी नोंदी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी ४९ लाख नोंदी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उर्वरित नोंदींची प्रक्रिया विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.

दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांनी शुक्रवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन जवळपास तीन तास चाललेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने जरांगे पाटील भर उन्हात उपोषण सुरू केले होते. अंतरवाली सराटी परिसरात जरांगे पाटील यांच्या घोषणा व सरकारचा निषेधासोबतच भगवेमय वातावरण बनले होते.

राधाकृष्ण विखे पाटील मध्यस्थीच्या भूमिकेत

राधाकृष्ण विखे पाटील अंतरवाली सराटीत सरकारचा ड्राफ्ट घेऊन आंदोलनस्थळी भेट देऊन एक ते दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. यामध्ये सुधारित काही मागण्या व या मागण्या संदर्भात जीआर काढून पुन्हा रात्री आठ वाजता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषणस्थळी आले आणि सरकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतल्याची माहिती सध्या दिली जात आहे.

समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या निर्णयाचे पडसाद जालना जिल्ह्यासह राज्यभर उमटत असून, मराठा समाज आक्रमक झाल्याचे चित्र दिसून आले. त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर उतरून रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘मनोज जरांगेंना आरक्षण अन् लोकशाहीचं शून्य ज्ञान’; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Web Title: Manoj jarange ended his hunger strike at midnight

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 07:18 AM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात
1

Maratha Reservation : ‘फडणवीस मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत’; भास्कर जाधवांचा घणाघात

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली
2

Manoj Jarange Patil: …तर मराठे शिंदेंना..; मनोज जरांगे पाटलांची जीभ घसरली

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम
3

‘मी मेलो तरी माझं मढं मुंबईला घेऊन जा’, ‘१२ सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य करा, अन्यथा…’ मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल
4

Maratha Reservation: ‘जरांगे पाटलांना आंदोलनाची वेळ का आली?’ कॉकरोच जनता पार्टीचे अभिजीत दिपकेंचा सरकारवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.