Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुम्ही जाळात हात घालू नका’; संतोष देशमुख हत्येप्रकरणावर जरांगेंचा धनंजय मुंडेंना इशारा

धनंजय मुंडे तुमच्या घरातील कोणी मेल्यावर किंवा मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुम्ही जाळात हात घालू नका. माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलत आहात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 12, 2025 | 07:10 AM
'मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

'मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका'; मनोज जरांगेंचे आंदोलकांना आवाहन

Follow Us
Follow Us:

जालना : गेल्या काही दिवसांपासून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरु आहे. अत्यंत क्रूरपणे त्यांची हत्या झाल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येप्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचेही नाव घेतले जात आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठं विधान केले आहे. ‘तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल’, असे त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : नवीन व्हायरसचा धोका असताना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना ताळे; तात्काळ सुरु करण्याची रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

मागील महिन्यात 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते. त्यानंतर धाराशिवमध्ये संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. ते म्हणाले, ‘धनंजय मुंडे त्याच्या गुंडांच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. सगळं पाप झाकण्यासाठी ओबीसींचं पांघरून घेत आहेत. यात ओबीसींचा काय संबंध? संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखला तुम्ही धमकी देता. आम्ही गुंडाला बोलायचं नाही? धनंजय मुंडे कोणत्या दिशेला घेऊन चाललाय? आंदोलनं करायला सांगतो. प्रतिमोर्चे काढायला सांगतो.

तसेच धनंजय मुंडे तुमच्या घरातील कोणी मेल्यावर किंवा मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुम्ही जाळात हात घालू नका. माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलत आहात. तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी जातीवाद करत नाही पण…

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, ‘मी जातीवाद करत नाही. पण, मराठ्यांना न्याय मागताना, संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना, कोणाला जातीवाद वाटत असेल, तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही’.

हेदेखील वाचा : Maha Vikas Aghadi broke : शिवसेना तर पडली महाविकास आघाडीच्या बाहेर! कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे तरी काय?

Web Title: Manoj jarange warning to dhananjay munde over santosh deshmukh case issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 07:10 AM

Topics:  

  • dhananjay munde
  • Manoj Jarange
  • Santosh Deshmukh Case

संबंधित बातम्या

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?
1

‘आता शिष्टमंडळ जाणार नाही, शेवटी त्यांनी…’; विखे-पाटलांनी जरांगेंबाबत नेमकं काय म्हटलं?

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!
2

Maratha Reservation Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा १० वा दिवस; मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचे ४ मोठे GR जारी!

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव
3

Maratha Reservation: जरांगेंच्या समर्थनार्थ धाराशिव ठप्प; कळंब-लातूर मार्गावर रास्ता रोको, टायर जाळल्याने तणाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.