Corona's havoc in the district! On the same day, 83 new patients, the number of active patients reached half a dozen
मुंबई : सध्या मुंबईत कोरोना (Corona) रुग्ण संख्येत घट झाल्याने पालिकेनं (BMC) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘कोविड’ बाधित रुग्णांची संख्या घटल्यामुळे ८ ‘जम्बो कोविड केअर केंद्रे’ (Jambo covid centre) बंद करण्यात येत आहेत. तथापि, नव्याने आढळून येणा-या ‘कोविड’ बाधित रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने सेव्हन हिल्स (Seven hills) रुग्णालयासह महानगरपालिकेची ४ प्रमुख रुग्णालये, (Covid hospital) १६ उपनगरीय रुग्णालये आणि कस्तुरबा रुग्णालय या ठिकाणी कोविड बाधित रुग्णांवर योग्य ते औषधोपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
[read_also content=”औरंगाबाद नामांतराला उच्च न्यायालयात आव्हान, १ ऑगस्ट रोजी सुनावणी निश्चित https://www.navarashtra.com/maharashtra/aurangabad-city-name-change-hearing-on-next-week-bombay-high-court-308861.html”]
दरम्यान, या व्यतिरिक्त शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये, खासगी रुग्णालये या ठिकाणी देखील उपचार सुविधा उपलब्ध आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सदर तिनही प्रकारच्या रुग्णालयांमध्ये एकूण ११ हजार १६५ रुग्णशय्यांची उपलब्धता असून आवश्यकतेनुसार ही संख्या वाढविता येऊ शकेल. तसेच सोमय्या जम्बो सेंटर, शीव (सायन) येथे एक जम्बो कोविड केंद्र सुसज्ज ठेवण्यात आले आहे. असं पालिका प्रशासनाने सांगितले आहे.