Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: जिल्हा बँक निवडणुकीत शेवटच्या ठरावाकडे लक्ष; हातगेघर सोसायटी ठरणार निर्णायक

Satara Politics: जावळी तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोसायट्यांच्या ठरावांवरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. हातगेघर सोसायटीच्या अंतिम ठरावासाठी भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात चुरशीची लढत रंगली आहे

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 04, 2026 | 01:53 PM
जिल्हा बँकेत जाण्याचा शिंदेंचा दरवाजा तूर्तास बंद?

जिल्हा बँकेत जाण्याचा शिंदेंचा दरवाजा तूर्तास बंद?

Follow Us
Follow Us:
  • हातगेघर सोसायटीचा ठराव आज
  • शिवेंद्रसिंहराजे-शशिकांत शिंदे गटात प्रतिष्ठेची लढाई
  • हातगेघर सोसायटीच्या ठरावावर मानकुमरे यांची प्रतिष्ठा पणाला
 

दत्तात्रय पवार , मेढा :  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोसायटीचे ठराव हे हिंसक वळणावर पोचले आहेत. अंतिम टप्प्यामध्ये एकमेव उरलेल्या हातगेघर सोसायटीच्या ठरावासाठी जि.प.सदस्य वसंतराव मानकुमरे यांची चांगलीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. तब्बल वीस दिवसानंतर आज हातगेघर सोसायटीचे सहलीवर गेलेले पाच संचालक गावात परतणार आहेत. त्यामुळे या सोसायटीचा ठराव कोणाच्या बाजूने होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

जावळी तालुक्यात सोसायट्यांचे ठराव हे विवाद विवादांमध्ये अडकलेले पाहायला मिळत आहेत.आखाडे गावात तर हा वाद टोकाला गेला होता.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रदेशाध्यक्ष शिंदे यांचे समर्थक अक्षरशः पोलिसांसमोर एकमेकांना भिडले होते.यावेळी कोनाकोणाच्या कानाखाली बसली याची गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. ठराव आपल्याच गटाला घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे विरुद्ध बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.

Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे या ठराव प्रक्रियेत मैदानात उतरलेले असून तालुक्यातील शेवटचा हातगेघर सोसायटी ठराव फक्त उरलेला आहे. हातगेघर, कावडी, पानस,विवर,आखेगणी, सायघर अशा सहा गावांची ही सोसायटी असून या सोसायटीवर तालुक्याचे भाजप नेते वसंतराव मानकुमरे यांचे वर्चस्व आहे. मात्र वर्चस्व असताना देखील एकूण दहा संचालक असलेल्या सोसायटीमधील पाच संचालक हे शशिकांत शिंदे यांनी वीस दिवसांपूर्वीच सहलीवर नेले आहेत. त्यामुळे मानकुमरे यांची चांगलीच पंचायत झालेली पाहायला मिळते.

सहा गावांचा मेळ मानकुमरेभाऊ घालणार का?

हातगेघर सोसायटीत सहा गावांचा समावेश आहे. या सोसायटीचा ठराव आपल्या गटाचा व्हावा असे आदेश मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मानकुमरे यांना दिले आहेत. त्यामुळे गेली आठ दिवसांपासून वसंतराव मानकुमरेभाऊ हे गावात तळ ठोकून आहेत. आज बुधवारी होणाऱ्या ठरावाच्या बैठकीत पुरेसे संख्याबळ नसतानाही आपला स्वतःचा ठराव व्हावा यासाठी या सहा गावांचा मेळ घालण्यात मानकुमरेभाऊ यशस्वी होतात का हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान आज बुधवारी हातगेघर सोसायटीचा ठराव एकीकडे होत असतानाच याच गावात बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमास हजेरी लावणार आहेत. तर याच हातगेघर मध्ये राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे सोसायटी व्हाईस चेअरमन नारायण पार्टे यांच्या ६५ वा अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी या होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समर्थक  हातगेघर गावात हजर राहत असल्याने मोठा राडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मात्र प्रशासनाने जावळीत जमावबंदी आदेश व कलम १४४ लागू केले आहे.

अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रॅम्प नसल्याची तक्रार; साताऱ्यात दिव्यांग बांधव आक्रमक

Web Title: Jawali district bank election hatgeghar society resolution political battle shivendraraje bhosale vs shashikant shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • Bank
  • Satara
  • Shivendraraje Bhosale

संबंधित बातम्या

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
1

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
2

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित
3

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर
4

Satara News: ‘तपासणी करा, नाहीतर कायद्याच्या कचाट्यात’; ग्रामपंचायतींच्या कारभारावर जनहक्क समितीची नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.