Satara News: राष्ट्रवादीकडून भाजप सदस्याची अडवणूक!; कोरेगाव पंचायत समितीत निधी वाटपावरून रणकंदन
आज सकाळी कोरेगाव येथील पंचायत समिती बाहेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निधी वाटपात महिला सदस्यांना डावल्याने वाठार स्टेशनं गणांतील अनेक काम रखडली असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी मात्र सत्तेचा गैरवापर करत स्वतः च्या सदस्यांना भरीव निधी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोरेगाव पंचायत समिती वर राष्ट्रवादीची सत्ता आहे. या पंचायत समिती मध्ये भाजपच्या वाठार स्टेशनं गणांतून अनिता भोईटे या एकमेव महिला सदस्या निवडून आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाची एक महिला सदस्या निवडून आल्या तर राष्ट्रवादी दोन्ही गटाचे एकूण 9 सदस्य निवडून आले. यामुळे या पंचायत समिती वर त्यांची एक हाती सत्ता आहे.
यावेळी अनिता भोईटे म्हणाल्या, ”कोरेगाव पंचायत समितीच्या निधी वाटपात वाठार स्टेशन गणावर जाणीवपूर्वक अन्याय करण्यात आला आहे. पंधराव्या वित्त आयोगातील ७० लाखाचा निधी हक्काचा असताना फक्त २३ लाख रुपयेच मंजूर करून दुजाभाव करण्यात आला आहे. निधीवाटप राजकीय पक्ष पाहून न करता गरज व नियमानुसार व्हावे, न्याय न मिळाल्यास जनआंदोलन छेडणार असल्याचा इशारा भाजपच्या वाठार स्टेशन पंचायत समिती सदस्या अनिता भोईटे यांनी दिला. यावेळी वाठार स्टेशनं चे माजी उप सरपंच संजय भोईटे, सेवासोसायटी चेअरमन बळीराम काळोखे उपस्थित होते.






