Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Jaykumar Rawal : कृषी उत्पन्न बाजार समित्यांना रोजगार आणि उद्योजकतेची नवी दिशा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. २९ सप्टेंबरला राज्यभर १ हजार ठिकाणी होणाऱ्या रोजगार महाकुंभात सुमारे २०० बाजार समित्या सहभागी होणार आहेत.

  • By विवेक
Updated On: Sep 15, 2026 | 08:58 PM
‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Follow Us
Follow Us:
  • ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’, जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना आवाहन.
  • २९ सप्टेंबरला १ हजार ठिकाणी रोजगार महाकुंभ, सुमारे २०० बाजार समित्या सहभागी होणार.
  • कृषी प्रक्रिया, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि निर्यातीत रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्यावर भर.
 

Jaykumar Rawal : कृषी उत्पन्न बाजार समित्या म्हटलं की आतापर्यंत डोळ्यासमोर शेतमालाची आवक, लिलाव आणि विक्रीचं चित्र उभं राहतं. मात्र आता या बाजार समित्यांना रोजगारनिर्मिती आणि उद्योजकतेची नवी दिशा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे उद्योजक व्हावं, असं आवाहन पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे.

२९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी १ हजार ठिकाणी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे २०० कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार आहेत. युवकांना रोजगार, व्यवसाय आणि कौशल्यविकासाच्या संधी मिळाव्यात, यासाठी बाजार समिती स्तरावर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

या पार्श्वभूमीवर जयकुमार रावल यांनी बाजार समित्यांच्या सभापतींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी बाजार समित्यांनी केवळ शेतमालाच्या व्यवहारापुरतं मर्यादित न राहता स्थानिक अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम करावं, असं सांगितलं.

कृषी क्षेत्राशी जोडलेल्या उद्योगांत मोठ्या संधी

शेतमालावर प्रक्रिया, साठवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक्स, पॅकेजिंग, ग्रेडिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि निर्यात अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊ शकतो. ट्रक ड्रायव्हिंगपासून आधुनिक लॉजिस्टिक्स आणि अन्नप्रक्रिया उद्योगापर्यंत युवकांना विविध कौशल्याधारित संधी उपलब्ध करून देता येतील, असं रावल यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्राचा शेतमाल फक्त राज्यातील बाजारपेठेत न राहता देशभर आणि पुढे जगातील प्रमुख शहरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मजबूत व्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. यासाठी प्रक्रिया, योग्य साठवणूक, वाहतूक, आकर्षक पॅकेजिंग आणि ब्रँडिंग यांची सांगड घालावी लागणार आहे.

बाजार समित्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

रोजगार महाकुंभासाठी बाजार समित्यांनी आवश्यक ठिकाणी स्टॉल उभारावेत, विविध उद्योग आणि रोजगारदात्यांना सहभागी करून घ्यावं, कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि रोजगाराच्या संधींची मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी करावी, अशा सूचना रावल यांनी दिल्या.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या उपक्रमासाठी बाजार समित्यांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं. एकूणच, बाजार समिती म्हणजे फक्त माल विक्रीचं ठिकाण नाही, तर रोजगार, व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचं मोठं केंद्र बनू शकतं, असा संदेश या बैठकीतून देण्यात आला आहे.

Web Title: Jaykumar rawal agri market committees employment mahakumbh farmers children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • Farmer Issue
  • Jaykumar Rawal
  • Maharashtra Government
  • Mangalprabhat Lodha

संबंधित बातम्या

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
1

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय
2

Maharashtra Cabinet Meeting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारचे 7 मोठे निर्णय

‘शेतात जाऊन येतो…’ म्हटलेला शेतकरी परतलाच नाही; विष प्राशन करून संपवलं जीवन
3

‘शेतात जाऊन येतो…’ म्हटलेला शेतकरी परतलाच नाही; विष प्राशन करून संपवलं जीवन

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…
4

MPSC प्रशासनात खळबळ! सचिव महेंद्र हरपाळकरांशी गैरवर्तनानंतर अधिकारी-कर्मचारी आक्रमक; थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.