संतोष देशमुखांच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी मोठा खुलासा झाला आहे. हत्या होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ८ डिसेंबर रोजी, संतोष देशमुख यांनी पत्नी अश्विनी देशमुख यांच्याशी बोलताना “वाल्मिक कराड आणि त्याची लोकं मला मारून टाकतील” अशी भीती व्यक्त केली होती, असे दोषारोपपत्रातील त्यांच्या जबाबावरून उघड झाले आहे. या घटनेनंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या नव्या खुलाशामुळे या प्रकरणात आरोपींवरचा दबाव आणखी वाढणार आहे.
८ डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांनी पत्नीला आपल्या हत्येची शक्यता व्यक्त केली. तर ९ डिसेंबरला त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. असं संतोष देशमुख यांच्या पत्नीने दिलेल्या दोषारोपपत्रातील जबाबातून हा महत्त्वाचा तपशील उघड झाला आहे. या नव्या पुराव्यानंतर प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता असून, आरोपींवरील खटल्याची सुनावणीला अधिक गंभीर वळणावर जाऊ शकते, असं घेऊ शकते.