Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील सर्वात मोठे कंटेनर बंदर ठरणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis : पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्याने जेएनपीटीच्या कंटेनर वाहतुकीला मोठी गती मिळणार आहे. 2030 पर्यंत जेएनपीटी देशातील दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले पहिले बंदर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 08:02 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • 2030 पर्यंत जेएनपीटीची क्षमता दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक होण्याचा फडणवीसांचा विश्वास.
  • पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्याने उत्तर भारताला जेएनपीटीशी थेट जोडणी.
  • जेएनपीटीसोबत वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राची सागरी आणि लॉजिस्टिक्स क्षमता वाढणार
 

मुंबई : महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स आणि सागरी क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. जेएनपीटी (Jawaharlal Nehru Port) हे 2030 पर्यंत दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले देशातील पहिले बंदर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीला आणखी मोठी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जेएनपीटीने सुमारे 38.27 लाख TEU कंटेनर हाताळले आहेत. समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या वाहतुकीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

उत्तर आणि पश्चिम भारताला जोडणारी महत्त्वाची मालवाहतूक मार्गिका

दादरी, उत्तर प्रदेश ते जेएनपीटी या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेतील जेएनपीटी ते न्यू उमरगाव हा महत्त्वाचा भाग कार्यान्वित होत आहे. सुमारे 1,500 किलोमीटर लांबीची ही मार्गिका उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडणार आहे. त्यामुळे जेएनपीटीसारख्या महत्त्वाच्या बंदराच्या लॉजिस्टिक्स सुविधांचा लाभ देशाच्या मोठ्या भूभागाला मिळणार आहे.

औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ

महाराष्ट्रातून या मार्गिकेचा सुमारे 178 किलोमीटरचा भाग जात असून, त्यासाठी जवळपास 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

लॉजिस्टिक्स खर्च कमी झाल्यास भारताची स्पर्धात्मकता वाढणार

जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग बनण्यासाठी देशातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लॉजिस्टिक्स खर्चात घट झाली असून, समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यात आणखी सुधारणा होईल, असा दावा त्यांनी केला. यामुळे भारताची जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढण्यासोबतच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

JNPT सोबत वाढवण बंदरामुळे महाराष्ट्राची सागरी ताकद वाढणार

जेएनपीटीच्या विस्तारासोबतच वाढवण बंदराचा विकास सुरू आहे. या दोन्ही बंदरांना सक्षम रेल्वे मालवाहतूक जोडणी मिळाल्यास महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे Maritime Power आणि Global Logistics Hub म्हणून विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेची क्षमता, बांधकामातील अभियांत्रिकी आव्हाने आणि जेएनपीटीशी जोडणीमुळे मालवाहतुकीला मिळणाऱ्या गतीची माहिती दिली. जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनीही प्रकल्प उभारणीत भारत-जपान सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

Web Title: Jnpt port 2030 devendra fadnavis dedicated freight corridor maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 08:02 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर
1

Kokan Ganeshotsav: कोकणवासीयांना मोठं गिफ्ट! गणेशोत्सवात ‘या’ महामार्गांवर टोलमाफी जाहीर

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग
2

Indian Railway : समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेमुळे देशाच्या लॉजिस्टिक्स व्यवस्थेला नवी गती जेएनपीटीहून मालवाहतुकीचा वाढणार वेग

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील
3

Maharashtra Cabinet Decisions : खेळाडूंसाठी मोठा निर्णय! खेळाडूंच्या ५% आरक्षणापासून ‘प्रगती’ आरोग्य प्रकल्पाला हिरवा कंदील

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण
4

PM Narendra Modi: उत्तर भारत थेट JNPA बंदराशी जोडणार; २०,७०० कोटींच्या WDFCच्या ३ टप्प्यांचे आज मोदींच्या हस्ते लोकार्पण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.