Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jogeshawari SRA News: जोगेश्वरीतील ‘एसआरए’ प्रकल्पाची १५ दिवसांत चौकशी; मंत्री शंभूराज देसाईंचे आदेश

या प्रकल्पात विकासकाकडून अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर एसआरए नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास विकासकाला हटविण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येईल.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 18, 2026 | 04:10 PM
Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion,

Maharashtra Assembly, UD Secretary Notice, Mumbai BMC Discussion,

Follow Us
Follow Us:
  • जोगेश्वरी (पूर्व) येथील मयूर नगरमधील एसआरए (SRA) प्रकल्प १९९६ मध्ये सुरू होऊनही अद्याप अपूर्ण
  • मंत्री शंभूराज देसाई यांनी १५ दिवसांत या प्रकल्पाची संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश
  • प्रकल्पात अनियमितता किंवा निकृष्ट काम आढळल्यास संबंधित विकासकाला हटवण्याची आणि एसआरए नियमांनुसार कठोर कारवाई
Jogeshawari SRA News: जोगेश्वरी (पूर्व) मयूर नगर, मौजे मरोशी येथील १९९६ मधील ‘एसआरए’ प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. या प्रकल्पात २००३ पासून रहिवासी वास्तव्यास असून, इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण झाली आहे. येथील ७५१ पात्र लाभार्थ्यांना अद्याप मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. विकासकाने नियमांचे उल्लंघन केल्याचा आणि कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप सदस्य अनंत (बाळा) नर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे विधानसभेत केला.

शासनाची भूमिका आणि कारवाईचे संकेत

या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पातील पात्रता, प्रलंबित भोगवटा प्रमाणपत्रे (OC) आणि अनधिकृत बांधकामांची संयुक्त पाहणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या सर्व मुद्द्यांची पुनर्तपासणी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले असून, अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.

नांदेड भाजपला आता निष्ठावंतांची गरज नाही? स्वीकृत नगरसेविकांबाबत आश्वासन वेगळे अन् निर्णय वेगळा

मंत्री देसाई म्हणाले की, या प्रकल्पात विकासकाकडून अनियमितता झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर एसआरए नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. आवश्यक असल्यास विकासकाला हटविण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येईल. जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी सुधारित विकास नियंत्रण नियमावली (डीसीपीआर २०३४) अंतर्गत महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित असून त्याचा लाभ अशा प्रकल्पांना होणार आहे. या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर एसआरए योजनांमध्ये अधिक सुविधा, विस्तारित घरांचे क्षेत्रफळ तसेच पायाभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही मंत्री देसाई यांनी नमूद केले.

काय आहे जोगेश्वरीतील SRA प्रकल्प

जोगेश्वरी (पूर्व) येथील मयूर नगर, मौजे मरोशी (ता. बोरिवली) येथील एसआरए (SRA – Slum Rehabilitation Authority) प्रकल्प हा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा एक भाग आहे. या प्रकल्पाबाबतची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

प्रकल्पाची सुरुवात: या प्रकल्पाची अधिकृत नोंदणी १९९६ मध्ये झाली होती. म्हणजेच हा प्रकल्प गेल्या २५-३० वर्षांपासून सुरू आहे.

सध्याची स्थिती: या इमारतींमध्ये रहिवासी २००३ पासून वास्तव्यास आहेत. मात्र, अद्यापही हा प्रकल्प कागदोपत्री पूर्ण झालेला नाही.

मुख्य समस्या:  अपर्ण काम: प्रकल्प २५ वर्षांनंतरही पूर्ण झालेला नाही.

गॅस एजन्सीचालक मस्त, ग्राहक मात्र त्रस्त! भर उन्हात तासनतास रांगेत उभे राहून गॅस

जीर्ण अवस्था: इमारती जुन्या झाल्या असून त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे, ज्यामुळे रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुविधांचा अभाव: ७५१ पात्र लाभार्थींना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा मिळत नाहीत.

प्रशासकीय त्रुटी: अनेक रहिवाशांची पात्रता अद्याप प्रलंबित आहे आणि इमारतींना आवश्यक असलेले भोगवटा प्रमाणपत्र (Occupation Certificate – OC) मिळालेले नाही.

विकासकावर आरोप: संबंधित विकासकाने नियमांचे उल्लंघन केले असून कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट राखल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.

या सर्व तक्रारींची दखल घेऊन राज्य सरकारने आता या प्रकल्पाची संयुक्त पाहणी करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

 

Web Title: Jogeshwari sra project probe minister shambhuraj desai orders report within 15 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Shambhuraj Desai
  • sra

संबंधित बातम्या

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात
1

Satara News: वाईच्या विकासाच्या आड येऊ नका; मी थांबणार नाही!; नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा घणाघात

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या
2

Buldhana Sarpanch Ends his Life: बीडनंतर आता बुलढाणा हादरले; करमोडा गावच्या सरपंचाची व्हिडिओ बनवून आत्महत्या

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी
3

Dharashiv BJP Politics: धाराशिव भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; BJYM जिल्हाध्यक्ष राहुल काकडेंची तडकाफडकी हकालपट्टी

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर
4

Maharashtra Breaking News Live Updates Today:  केरळ राज्याचे नाव आता केरळम् होणार, लोकसभेत नामांतरांचे विधेयक मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.