Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News: पत्रकाराला धमकी प्रकरण; लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कडाव ग्रामपंचायतीवर धडक…

गेली दहा वर्ष कडाव ग्रामपंचायत आणि एसटी डेपो यांना अनधिकृत बस थांबाबाबत पत्रव्यवहार करीत असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 24, 2025 | 08:29 PM
Karjat News: पत्रकाराला धमकी प्रकरण; लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची कडाव ग्रामपंचायतीवर धडक…
Follow Us
Close
Follow Us:

कर्जत:  कर्जत तालुक्यातील कडाव गावात एसटी बसथांबा बेकायदेशीररित्या बळकावून तिथे अनधिकृत दुकाने उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ पत्रकारांनी सोमवारी (ता.२४) कडाव ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी ग्रामसेवकांना निवेदन देत २ जुलैपर्यंत बेकायदेशीर बांधकाम हटवण्याची तसेच त्या जागेवरील बांधकाम बद्दल लावण्यात आलेले असेसमेंट रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा १० जुलैपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे. या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने आवाज उठवत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना धमक्या दिल्याची बाबही पुढे आल्याने संताप आणखी वाढला आहे.

कडाव गावात १९७७-७८ साली एसटी महामंडळाने अधिकृत बसथांबा बांधला होता. परंतु आता विनोद काशिनाथ पवाळी, रमेश मारुती पवाळी आणि उमेश यशवंत ऐनकर या तिघांनी संगनमताने त्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून दुकाने उभारल्याचा आरोप आहे. यामुळे प्रवासी, विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणाची तक्रार कर्जत एसटी विभाग आणि ग्रामपंचायतीकडे देण्यात आली असूनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही.

उलट ग्रामपंचायतीने परवानगी न देता या दुकानदारांकडून घरपट्टी वसूल केल्याचे उघड झाले आहे.त्यानंतर संबंधित विषयाची बातमी देणारे पत्रकार प्रभाकर गंगावणे यांना एसटी थांबा बळकावनारे व्यक्तीकडून मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे संतप्त होत कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकार कडाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर पोहचले.स्थानिक राजकारणी आणि प्रशासन यांच्याकडून बेकायदेशीर बांधकामाला पाठिंबा मिळतोय याबद्दल पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

सबंधित विषयी पत्रकारांनी ग्राम सचिवालय समोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्यानंतर ग्रामपंचायत अधिकारी गिरासे हे कार्यालयातून बाहेर आले आणि तळमजल्यावर जमलेल्या पत्रकारांना भेटले.तेथे पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर ग्रामपंचायत अधिकारी गिरासे यांनी कार्यवाही सुरू असून कागदोपत्री परवानगी आल्यावर कार्यवाही होईल असे आश्वासन दिले.

या निषेध आंदोलनात तक्रारदार प्रभाकर गंगावणे तसेच पत्रकार संतोष पेरणे,नरेश जाधव,भूषण प्रधान,कैलास म्हामले,रमाकांत जाधव,महेश भगत,कृष्णा सगने,किशोर गायकवाड, मोतीराम पादिर, रजनीकांत पवाळी,अजय गायकवाड,गणेश पवार,सतीश पाटील,आनंद सकपाळ,गणेश मते,जगदीश दगडे,कांता हाबळे, रोशन दगडे,गणेश लोट, नरेश कोलंबे यांच्यासह अनेक पत्रकार आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी ग्रामपंचायतीकडे जोरदार निषेध नोंदवत अनधिकृत बांधकाम तत्काळ हटवण्याची ठाम मागणी केली. यावेळी दिलेल्या निवेदनात २ जुलै २०२५ पर्यंत कारवाई न झाल्यास १० जुलैपासून कडाव येथील ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला. उपस्थितांनी एकमुखीने सांगितले की, सार्वजनिक सुविधांवर बेकायदेशीर अतिक्रमण हा सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आहे आणि प्रशासनाने याप्रकरणी ठोस भूमिका घेतली पाहिजे.

गेली दहा वर्ष कडाव ग्रामपंचायत आणि एसटी डेपो यांना अनधिकृत बस थांबाबाबत पत्रव्यवहार करीत असूनही प्रशासनाने कोणतीच दखल घेतली नाही.वेळीच दखल घेतली असती तर अनधिकृत गाळा उभारणाऱ्या व्यक्तींपैकी विनोद पवाली नामक व्यक्तीने मला धमकी देण्यापर्यंत त्याची मजल गेली नसती. प्रशासनाने १० जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न केल्यास आम्ही सारे पत्रकार बांधव कडाव ग्रामपंचातसमोर बेमुदत उपोषण करणार आहोत.

– प्रभाकर गंगावणे, तक्रारदार

Web Title: Journalists protest outside kadav gram panchayat office over threat karjat crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2025 | 08:29 PM

Topics:  

  • crime news
  • Karjat
  • karjat news

संबंधित बातम्या

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…
1

कारागृहातच कैद्याची आत्महत्या; लोखंडी गजाला जोरदार धडक दिली अन् जखमी होताच…

Gautami Patil: तरुणांना घायाळ करणारी गौतमी हमसून हमसून रडली; म्हणाली, “हे घडले तेव्हा…”
2

Gautami Patil: तरुणांना घायाळ करणारी गौतमी हमसून हमसून रडली; म्हणाली, “हे घडले तेव्हा…”

Crime News : सामूहिक आत्महत्या की हत्या? 18 व्या मजल्यावरून मारली उडी अन्… तरुणांच्या मृत्यूने विरारमध्ये खळबळ
3

Crime News : सामूहिक आत्महत्या की हत्या? 18 व्या मजल्यावरून मारली उडी अन्… तरुणांच्या मृत्यूने विरारमध्ये खळबळ

मुलीला थार गाडीत नेलं, गोळ्या खायला दिल्या अन्…; साताऱ्यातील संतापजनक प्रकार
4

मुलीला थार गाडीत नेलं, गोळ्या खायला दिल्या अन्…; साताऱ्यातील संतापजनक प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.