कल्याण : चार मित्र जमले आणि दारुची पार्टी सुरु झाली. मात्र एकाने दुसऱ्यावर गोळी झाडली. जखमी अवस्थेत सुशिलकुमार महंतो नावाच्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आत्ता क्राईम ब्रांच पोलिसांनी मित्रावर गोळीबार करणाऱ्या उमेश खानविलकर याला बेड्या ठोकल्या आहेत. मात्र उमेश खानविलकरने बंदूक कुठून आणली. याचा तपास आत्ता पोलिसांनी सुरु केला आहे. याचे उत्तर मिळते की नाही हे पाहावे लागेल.
कल्याण पश्चिमेतील बंदरपाडा परिसरात सोमनाथ म्हात्रे या व्यक्तीच्या घरात चार मित्र जमा झाले. हे चौघे पार्टीसाठी जमा झाले होते. पार्टी सुरु असताना उमेश खानविलकर नावाच्या तरुणाने मजा मस्तीत बंदूकीतून त्याचा मित्र सुशिलकुमार महंतो यांच्या दिशेने गोळी झाडली. त्यावेळी सुशीलकुमार याने हात आडवा केला. तेव्हा त्याच्या हाताच्या पंजाला भेदून गोळी त्याच्या तोंडात गेली. गोळीने त्याची जीभ फाडली. त्याच्या घसात ही गोळी अडकल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरु आहे.
गोळीबार करुन उमेश खानविलकर हा पसार झाला होता. कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी राहुल मस्के, पोलीस कर्मचारी गुरुनाथ जरक, रमाकांत पाटील, किशोर पाटील, यांच्या पथकाने गोळी बार करणाऱ्या उमेश खानविलकरला बेड्या ठोकल्या आहेत. उमेश याला शहाड स्थानकातून अटक केली. तो लोकल ट्रेन पकडून मुंबईच्या दिशेने जाणार होता. उमेशला आत्ता खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. उमेश याने असे पोलिसांनी सांगितले की, त्यांनी जुन्या रागातून सुशील वर गोळीबार केली आहे. मात्र त्यांच्यात वाद काय होता त्यांनी अद्याप यावर काहीही बोललं नाहीये. त्याला गावठी पिस्तूल सोमनाथ म्हात्रे यांने दिली होती. या प्रकरणाचा पुढील तपास खडकपाडा पोलीस करणार आहेत. उमेश खानविलकरला बंदूक कोणी दिली. त्याने कुठून आणली याचा तपास लागणे गरजेचे आहे.
Web Title: Kalyan crime news sushil kumar mahonto crime branch police bandarpada in kalyan west kalyan thane dombivli crime news umesh khanwilkar