Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News : नागरिकांचा जीव धोक्यात! गटाराच्या पाण्यामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरुप, कल्याण डोंबिवली मनपाचा हलगर्जीपणा

कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 09, 2025 | 02:20 PM
KDMC News : नागरिकांचा जीव धोक्यात! गटाराच्या पाण्यामुळे रस्त्याला नाल्याचं स्वरुप, कल्याण डोंबिवली मनपाचा हलगर्जीपणा
Follow Us
Close
Follow Us:

KDMC News :   मुंबई आणि उपनगराला पावसाने अक्षर: झोडपून काढलं आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अश्यातच आता कल्याण डोंबिवली मनपा परिसरात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण पूर्व पावशे नगर परिसरातील मुख्यरस्ता पुनालिंक रोड यासाठी गटार तुंबल्याने दुषित पाणी रस्त्यावर येत असून आजूबाजूच्या दुकांनाना आणि रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांना याचा मनस्ताप होत असल्याचं दिसून येत आहे. गेले तीन महिन्यापासून या परिसरातील नागरिक आणि दुकान मालक हैराण झाले असून वारंवार पालिकेकडे निवदेन देऊनही या समस्येवर पालिकेने ठोस उपाययोजना अजूनही केली नसल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे.

Thane News : गांधी हम शर्मिंदा है, आप के कातिल जिंदा है; महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात नागरिकांचं जोरदार आंदोलन

 

काही दिवसांपूर्वी पालिकेच्या कर्मचारी येऊन पाहणी केली. त्यावेळी चेंबरमध्ये पाण्याच्या बाटल्या,प्लास्टिक आणि इतर अडकून पडल्याने पाण्याला जायला मार्ग नाही. नागरिकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना साफ करुन देण्यास सांगितलं. फोनवर देखील वारंवार तक्रार दाखल केली होती. सततचा कचरा अडकून पडल्याने पाण्याचा मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे रस्ता खणून काम करावं लागेल. त्यासाठी बांधकाम विभागाला अर्ज करा. आम्ही यात काही करु शकत नाही, असं पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. पावशे नगर परिसरातील हा रस्ता मुख्य रस्ता असून कर्जत,बदलापूर आणि पुण्याला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने मोठ मोठ्या वाहनांची या ठिकाणी कायमच वर्दळ असते. या गटाराच्या पाण्याचं रस्यावरुन वाहण्याचं प्रमाण इतकं वाढलं आहे की, रस्त्याला नाल्याचं स्वरुप आलं आहे. या दुषित पाण्यामुळे रोगराईचं प्रमाण देखील वाढत आहे. या सगळ्याकडे पालिकेचं दुर्लक्ष असून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत आहे. नागरिकांना पालिकेला रितसर निवेदन दिलं, त्याशिवाय पालिकेच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवरुन तक्रार दाखल करुनही दखल घेतली जात नाही आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. पालिकेने कोणत्याही प्रकाराची दखल न घेतल्याने आमदार सुलभा गायकवाड यांच्याकडे स्थानिकांनी समस्या मांडली मात्र आमदार गायकवाड यांनी देखील दखल न घेतल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Thane News : कळव्यात पाणी पेटलं; पाण्यासाठी नागरिकांची प्रभाग समितीवर धडक

ही समस्या फक्त पांडुरंग पावशेनगरच्या मुख्य रस्त्य़ाचीच नाही तर हाच रस्ता पुढे विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकाला जोडतो. विठ्ठलवाडी स्मशानभूमी परिसरात उल्हास नदी पात्रात मोठं कंस्ट्रक्शनचं काम सुरु आहे. त्यामुळे नदीचं पाणी अडलं जात असून रस्त्यला असलेल्या चिखलामुळे आणि घाणीच्या साम्राज्यामुळे माणसांना रस्त्याने चालणं देखील कठीण झालं आहे. याकडे देखील पालिका डोळेझाक करत असून परिसरातील नागरिकांना रोजचा घाणीचा त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेचं कल्याण पूर्व परिरात मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. आधीच पावसाळा त्यात घाणीचं साम्राज्य यामुळे रहिवाशी जीव मुठीत घेऊन जगत आहे. मात्र कल्याण डोबिंवली महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना याची काहीच माहिती नसणं हे पालिकेच्या नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब करत आहे.

Web Title: Kalyan east pandurang pawashe nagar in the road has become a drain due to sewage water kdmcs negligence

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • kalyan dombivli muncipal corporation
  • kalyan news
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ
1

KDMC News : केडीएमसी निवडणूकीसाठी प्रभागांचे आरक्षण जाहिर! पण अंतर्गत सीमा रेषा स्पष्ट नसल्याने इच्छुकांमध्ये गोंधळ

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद
2

KDMC News : कल्याणकर पाणी जपून वापरा ! पुढचे 12 तास शहरातील ‘या’ भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Thane News : कल्याण सिटी पार्कलगतच्या मोबाईल टॉवरला रहिवाशांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय ?
3

Thane News : कल्याण सिटी पार्कलगतच्या मोबाईल टॉवरला रहिवाशांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय ?

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध
4

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.