Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यकृत दानाने बहिणीने दिले भावाला जीवदान

भावाचा जीव वाचविण्यासाठी बहीण माधुरी काळे हिने क्षणार्धात यकृताचा भाग देण्याची तयारी दाखविली आणि भावाला यकृताचा ६५ टक्के भाग देत जीवदान दिले.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Dec 10, 2023 | 05:32 PM
यकृत दानाने बहिणीने दिले भावाला जीवदान
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण : महाराष्ट्र पोलीस विभागाचा खेळाडू असलेल्या भावाचे यकृत खराब झाल्याने दुसऱ्याच्या यकृताचा भाग बसवूनच त्याला जीवदान देणे शक्य असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. यानंतर भावाचा जीव वाचविण्यासाठी बहीण माधुरी काळे हिने क्षणार्धात यकृताचा भाग देण्याची तयारी दाखविली आणि भावाला यकृताचा ६५ टक्के भाग देत जीवदान दिले. मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात ही किचकट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली.

अभिजीत भाबल आणि माधुरी काळे ही दोन सख्खी भावंडे, माधुरी शिक्षिका आणि कल्याण डोंबिवली महापालिकेची नगरसेविका तर अभिजीत महाराष्ट्र पोलीसचा खेळाडू. काही दिवसांपूर्वी अभिजीतचे लिव्हर खराब झाल्याने ते बदलण्याची गरज असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. त्याचा जीव वाचविण्यासाठी आपण यकृत देण्यास तयार असल्याचे माधुरी हिने स्वतः हून सांगितले. यानंतर आवश्यक चाचण्या करून ती डोनर होऊ शकते यावर डॉक्टरांनी शिक्कामोर्तब करताच माधुरीने न डगमगता वैद्यकीय परीक्षणासह शस्त्रक्रिये पर्यंतच्या सर्व कठीण परीक्षांना हसत हसत सामोरे जात माधुरीने आपल्या यकृताचा ६५ टक्के भाग दिला.

यावरून भाऊ बहीण हे नाते एकमेकांच्या काळजाचा तुकडा असल्याचे दाखवून दिले. २ डिसेबर रोजी ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक नात्यांना तितक्याच खंबीरपणे सांभाळणाऱ्या माधुरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Kalyan maharashtra police department abhijeet bhabal and madhuri kale a corporator of kalyan dombivli municipal corporation forties hospitals of mulund

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2023 | 05:32 PM

Topics:  

  • kalyan
  • Kalyan Dombivli Municipal Corporation

संबंधित बातम्या

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड
1

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪
2

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश
3

Kalyan : एपीएमसी शेतकरी शेड प्रकरणात हाय कोर्टाचा आदेश

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
4

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.