
फोटो सौजन्य- gemini
जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून कल्याण येथील मेट्रो जंक्शन मॉल व्यवस्थापनाच्या वतीने फोर्टिस हॉस्पिटलच्या सहकार्याने ‘हर घर सीपीआर हिरो’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी मेट्रो जंक्शन मॉलच्या मुख्य अॅट्रियम एरिना येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात १५० हून अधिक सहभागी झाले. यामध्ये मॉलमधील ग्राहक, विविध स्टोअरमधील रिटेलर्स व कर्मचारी, मॉल व्यवस्थापन तसेच सुरक्षा, हाऊसकीपिंग, अग्निशमन, एमईपी आणि पार्किंग विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हृदयविकाराचा झटका किंवा अन्य वैद्यकीय आणीबाणीच्या प्रसंगी वेळ न दवडता प्राथमिक मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. याच पार्श्वभूमीवर सहभागींना सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन), बेसिक लाइफ सपोर्ट (बीएलएस) तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सीपीआर डेमोन्स्ट्रेशन मॅनिकिनचा वापर फोर्टिस हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार व फिजिशियन तसेच नॅशनल फर्स्ट एड, बीएलएस आणि सीपीआर प्रशिक्षक डॉ. मनजीत सिंह अरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआरचे प्रात्यक्षिक आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. यासाठी ९ सीपीआर वापर डेमोन्स्ट्रेशन मॅनिकिनचा करण्यात आला. सहभागींना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआरची योग्य पद्धत स्वतः प्रत्यक्ष करून पाहण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्याचे महत्त्व, सीपीआरच्या मूलभूत पायऱ्या तसेच वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत करावयाच्या प्राथमिक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. ग्राहक आणि रिटेल स्टोअरमधील कर्मचारी यांच्यासह मॉलच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. या उपक्रमाचे आयोजन मॉल हेड नितीन म्हात्रे आणि ऑपरेशन्स हेड स्वप्नील सायगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
उपक्रमाच्या नियोजन व समन्वयासाठी देवराजन सपाटे, अभिलाष सुनीलकुमार, तेजेश सातपुते, अब्दुल अन्सारी, हेमल राणे आणि दीपक पटेल यांनी योगदान दिले. तसेच सुरक्षा, हाऊसकीपिंग, पार्किंग, अग्निशमन आणि एमईपी विभागाच्या प्रतिनिधींनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.
हृदयाशी संबंधित आपत्कालीन परिस्थितीत पहिल्या काही मिनिटांत मिळणारी मदत महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे सीपीआर आणि बेसिक लाइफ सपोर्टचे प्राथमिक प्रशिक्षण अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. कल्याणमधील या कार्यक्रमातून १५० हून अधिक जणांना सीपीआरचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळाले.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)