Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Kalyan Maggi News: मॅगी ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती असते! कारण ती फक्त २ मिनिटांत तयार होते आणि तिची चवही अप्रतिम असते. पण कल्याणमधील धक्कादायक प्रकारानंतर आता मॅगी खाण्याची इच्छा कमी होऊ शकते.नेमकं काय घडलं? जाणून घेऊया सविस्तर माहिती...

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 26, 2026 | 06:36 PM
ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Follow Us
Follow Us:
  • कल्याणमध्ये मॅगी बनवताना आढळल्या आळ्या
  • फेब्रुवारी 2027 पर्यंत मुदत असतानाही धक्कादायक प्रकार
  • FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
Kalyan Maggi News: फक्त २ मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीचे अगदी लहानपासून ते मोठ्यापर्यंत दीवाने असतात. चटपटीत मसाल्याच्या मॅगीवर सगळेच ताव मारतात. मात्र कल्याणमधून अशी एक धक्कादायक बातमी समोर येते..ज्यामुळे मॅगी खाण्याची इच्छा कमी होऊ शकते. कल्याणमध्ये मॅगी बनवत असताना नूडल्समध्ये आळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे संबंधित मॅगीच्या पॅकेटवर फेब्रुवारी 2027 पर्यंतची एक्सपायरी/बेस्ट बिफोर मुदत नमूद आहे. मुदत संपलेली नसतानाही उत्पादनामध्ये आळ्या कशा आल्या, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने नेहमीप्रमाणे मॅगी बनवण्यासाठी पॅकेट उघडले आणि नूडल्स शिजवण्यास सुरुवात केली. याच वेळी त्यामध्ये आळ्यांसारखे कीटक दिसून आले. मॅगी खाण्यापूर्वीच हा प्रकार निदर्शनास आल्याने संबंधित व्यक्तीने ती खाल्ली नाही.

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 …

2027 पर्यंत मुदत, तरी आळ्या कशा?

या प्रकरणातील महत्त्वाची बाब म्हणजे पॅकेटवर फेब्रुवारी 2027 पर्यंतची मुदत आहे. त्यामुळे उत्पादनाची मुदत वैध असल्याच्या विश्वासाने ते खाण्यासाठी वापरण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात नूडल्समध्ये आळ्या आढळल्याच्या दाव्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता, पॅकेजिंग तसेच साठवणुकीच्या परिस्थितीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा प्रकारामागे उत्पादन प्रक्रियेपासून वाहतूक, वितरण किंवा दुकान अथवा घरातील साठवणूक अशा विविध टप्प्यांपैकी नेमके कोणते कारण आहे, हे केवळ अधिकृत तपासणी आणि प्रयोगशाळेतील परीक्षणानंतरच स्पष्ट होऊ शकते.

FDAकडे तपासणीची मागणी

महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तपासण्या आणि कारवाया सुरू असतानाच कल्याणमधील हा प्रकार समोर आल्याने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. संबंधित पॅकेटचा बॅच नंबर, उत्पादन तारीख, बेस्ट बिफोर/एक्सपायरी माहिती आणि खरेदीचे ठिकाण तपासून त्याच बॅचमधील इतर उत्पादनांचे नमुनेही तपासावेत, अशी मागणी केली जात आहे. नमुना अधिकृत प्रयोगशाळेत पाठवल्यास त्यामध्ये प्रत्यक्षात कोणत्या प्रकारचे कीटक किंवा अळ्या होत्या आणि दूषित होण्याचे संभाव्य कारण काय असू शकते, याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते.

मोठ्या ब्रँडच्या गुणवत्तेवर प्रश्न

मॅगी हा मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा पॅकेज्ड खाद्यपदार्थ असल्याने या घटनेकडे ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे. मात्र या प्रकरणात FDA किंवा उत्पादक कंपनीच्या अधिकृत तपासणीचा निष्कर्ष समोर येईपर्यंत उत्पादनात आळ्या आढळल्याचा उल्लेख ग्राहकाकडून करण्यात आलेला दावा म्हणूनच मांडणे योग्य ठरेल.
या घटनेनंतर संबंधित उत्पादनाची अधिकृत तपासणी होते का, संबंधित बॅचबाबत कंपनी काय स्पष्टीकरण देते आणि FDAकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 …

Web Title: Worms found in maggi noodles in kalyan despite february 2027 expiry date food safety concerns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • FDA
  • food
  • kalyan

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग
2

McDonald’s चा मेन्यू बदलणार! बर्गर बाऊलपासून Egg Bites पर्यंत हाय-प्रोटीन पर्यायांची टेस्टिंग

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त
3

FDA ची पुन्हा धडक कारवाई; चक्क लक्झरी बस थांबवून मिठाईसाठी नेण्यात येणारा 16 लाखांचा खवा जप्त

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
4

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.