Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या,  सरनाईकांच्या ‘या’ निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट

Pratap Sarnaik: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे कल्याण–मुरबाड मार्गावरील एसटी बसच्या फेऱ्या ४८ वरून १०८ करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासीसंख्या २,२३८ वरून ५,०८० पर्यंत वाढली असून, 'राजमाता जिजाऊ' बससेवेलाही नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 03, 2026 | 04:29 PM
प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या, प्रताप सरनाईकांच्या 'या' निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट

प्रवाशांना मोठा दिलासा! कल्याण–मुरबाड मार्गावर एसटीच्या ४८ वरून १०८ फेऱ्या, प्रताप सरनाईकांच्या 'या' निर्णयामुळे प्रवासीसंख्या दुप्पट

Follow Us
Follow Us:
  • एसटी सेवेला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद
  • कल्याण–मुरबाड मार्गावरील वाढीव फेऱ्यांचा सकारात्मक परिणाम
  • ‘प्रताप सरनाईक’ यांच्या निर्णयाला प्रवाशांचा कौल
मुंबई : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारामुळे कल्याण–मुरबाड मार्गावरील एसटी बससेवेत करण्यात आलेली फेऱ्यांची वाढ प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरली असून, या निर्णयाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढीव फेऱ्यांमुळे प्रवासीसंख्या आणि बसची सरासरी भराव क्षमता लक्षणीयरीत्या वाढल्याचे एसटीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी, ५ मे २०२६ पर्यंत कल्याण आगारातून या मार्गावर दररोज ४८ फेऱ्या (ये-जा) चालवल्या जात होत्या. त्यावेळी दररोज सरासरी २,२३८ प्रवासी या सेवेचा लाभ घेत होते. मात्र, वाढत्या प्रवासीसंख्येमुळे या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. अपुऱ्या एसटी सेवेमुळे अनेक प्रवासी नाईलाजाने अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घेत होते. याच पार्श्वभूमीवर घडलेल्या एका दुर्दैवी प्राणांतिक अपघाताची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी स्वतः लक्ष घालून या मार्गावरील एसटी फेऱ्या तातडीने वाढविण्याचे निर्देश दिले.

पंढरपूर वारीतून एसटी महामंडळाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचे उत्पन्न; प्रताप सरनाईक यांनी दिली सविस्तर माहिती

या निर्णयानंतर कल्याण–मुरबाड मार्गावरील फेऱ्यांची संख्या ४८ वरून थेट १०८ करण्यात आली. परिणामी, आज या मार्गावर दररोज सरासरी ५,०८० प्रवासी एसटी सेवेचा लाभ घेत आहेत. म्हणजेच प्रवासीसंख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक ‘राजमाता जिजाऊ’ बसेसही सेवेत दाखल करण्यात आल्या असून, त्यालाही नागरिकांकडून मोठी पसंती मिळत आहे.

याशिवाय, कल्याण–मुरबाड मार्गावरून पुढे उंबर, अहिल्यानगर आदी भागांकडे जाणाऱ्या विविध आगारांच्या एसटी बसमध्येही मुरबाड–सरळगाव परिसरातील प्रवाशांना चढ-उताराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली असून, एसटी सेवा अधिक सुलभ आणि लोकाभिमुख बनली आहे.

याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे एसटीचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या मार्गांवर प्रवाशांची मागणी वाढत आहे, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार एसटीच्या फेऱ्यांमध्ये वाढ करून नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार सेवा देण्याचा आमचा प्रयत्न सातत्याने सुरू राहील. एसटी ही सामान्य जनतेची जीवनवाहिनी असून, तिचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”

ST Bus News: महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; NCMC स्मार्ट कार्डची अंतिम मुदत वाढली

Web Title: Kalyan murbad st bus services expanded passenger count doubles under pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • kalyan
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
2

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी
3

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक
4

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.