Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus Stand: एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

ST Bus Stand: एसटी महामंडळाच्या आगार आणि बसस्थानकांमधील स्वच्छता व्यवस्थेवर एसटी कर्मचारी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. स्वच्छतेची कामे अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत विद्यमान स्वच्छता निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 20, 2026 | 04:42 PM
एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर? आगार-बसस्थानकांतील स्वच्छतेचा बोजवारा; नव्याने निविदेची मागणी

Follow Us
Follow Us:
  • एसटीत ‘स्वच्छता’ फक्त कागदावर, स्वच्छतेचा बोजवारा
  • स्वच्छता निविदा रद्द करून नव्याने निविदा काढा
  • एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांची मागणी
मुंबई : महाराष्ट्राची लोकवाहिनी असलेल्या एसटीच्या बसस्थानकांवर प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या कामाचा बोजवारा उडाला असून कामात सुधारणा होत नसेल तर संबंधित संस्थेला केवळ नोटीस बजावून न थांबता विद्यमान स्वच्छता निविदाच रद्द करून नव्याने निविदा काढावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटीत स्वच्छते बद्दल वारंवार तक्रारी येत असल्याने बसस्थानकांचा परिसर, कर्मचारी विश्रांतीगृहे, स्थानक स्वच्छतागृहे आणि बसेसच्या स्वच्छतेसाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे .मात्र अनेक विभागांमध्ये स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा राखला जात नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. विशेषतः मोठ्या बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असतानाही पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे बरगे यांनी निदर्शनास आणून दिले.

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया…

नवे कंत्राट देण्यात येऊन त्याला साधारण चार महिने होऊनही स्वच्छतेत सुधारणा झाली नसल्याने व तक्रारी वाढल्याने परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाला स्पष्ट कारवाईचे निर्देश देऊनही संबंधित अधिकारी जबाबदारीने काम करीत नसतील, कंत्राटदाराला पाठीशी घालत असतील तर अशा बेजबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली पाहिजे.त्याच प्रमाणे स्वच्छतेचे कंत्राट घेतलेल्या संस्थेच्या कामात सुधारणा होत नसेल तर करार रद्द करून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

कर्मचाऱ्यांच्या सुविधेपुरती मर्यादित..

“स्वच्छता ही प्रवाशांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुविधेपुरती मर्यादित बाब नसून त्यांच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हजारो प्रवासी दररोज एसटी स्थानकांवर ये-जा करतात. त्यामुळे कर्मचारी व प्रवासी यांची स्वच्छतागृहे आणि बसस्थानकांचा परिसर चोवीस तास स्वच्छ ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि प्रभावी यंत्रणा असणे आवश्यक आहे.”पण ते दिसत नाही.“कंत्राटदाराने करारातील अटींची पूर्तता केलेली नसून कामाचा दर्जा समाधानकारक नाही आणि वारंवार तक्रारी होत असतील, तर केवळ कारणे दाखवा नोटीस देऊन कंत्राटदाराला पाठीशी घालण्यापेक्षा कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. सध्याची निविदा रद्द करून नव्याने निविदा काढताना मनुष्यबळ, कामाची गुणवत्ता, नियमित तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याच्या अटी अधिक कडक कराव्यात,” अशी मागणी त्यांनी केली.

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

Web Title: Msrtc cleanliness under question shrirang barge demands cancellation and fresh tender

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:42 PM

Topics:  

  • msrtc
  • st bus
  • ST Employee

संबंधित बातम्या

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा
1

MSRTC Volvo Buses: एसटीचा प्रवास होणार आणखी ‘लक्झरी’; 200 व्होल्वो बसेससह ऑनलाइन बुकिंग अन् दर्जेदार आतिथ्य सेवा

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
2

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही
3

MSRTC NCMC Card: ST प्रवाशांसाठी मोठी सुविधा! NCMC कार्ड आता ‘या’ वरून करा रिचार्ज; केंद्रावर जाण्याची गरज नाही

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
4

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.