Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

KDMC News: रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

KDMC News: कल्याणनजीक मांडा-टिटवाळ्यातील नांदप रोडवरील इंदिरा नगर परिसरात नाल्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडल्याचा आरोप असून, पाणी रस्त्यावरून थेट नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 20, 2026 | 04:23 PM
रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

रस्त्याच्या भरावामुळे नाल्याचा प्रवाह अडला? इंदिरा नगरमध्ये घर-दुकानांत घुसले घाण पाणी; मनसे आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • कल्याण नजीक टिटवाळ्यात केडीएमसीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
  • नाल्याचे पाणी रस्त्यावर, थेट घर-दुकानात
  • नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान
KDMC News: कल्याणनजीक मांडा-टिटवाळा परिसरातील नांदप रोडवरील इंदिरा नगरमध्ये नाल्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याच्या कामादरम्यान करण्यात आलेल्या भरावामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यातील घाण पाणी रस्त्यावरून वाहत थेट नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत असल्याने रहिवासी आणि व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे.

नाल्याचे पाणी थेट घर-दुकानांत

इंदिरा नगर परिसरातील नाल्याचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाल्याने ते रस्त्यावर साचत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने हे दूषित पाणी परिसरातील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरत आहे. त्यामुळे घरगुती साहित्य, दुकानांमधील माल आणि इतर वस्तूंचे नुकसान झाल्याचे नागरिकांनी सांगितले. स्थानिक रहिवासी मंगेश कचरे यांच्या घरात आणि दुकानातही नाल्याचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी घरात शिरल्यामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच नागरिकांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत झाले आहे.

Buldhana News: परतीच्या पावसाची पिकांना आशा, सोयाबीन, उडीद, मुगाचे पीक गेले; आता कपाशी तुरीवर भिस्त

रस्त्याच्या भरावामुळे समस्या निर्माण झाल्याचा आरोप

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरात करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामादरम्यान टाकलेल्या भरावामुळे नाल्यातील पाण्याचा प्रवाह बाधित झाला. पूर्वी नाल्यातून वाहून जाणारे पाणी आता रस्त्यावर येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. रस्त्याचे काम करताना पावसाचे आणि सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्यात आले होते का, नाल्याच्या प्रवाहाचा विचार करण्यात आला होता का आणि पाण्याच्या निचऱ्यासाठी पुरेशी व्यवस्था का करण्यात आली नाही, असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहेत.

मनसे पदाधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे आणि दिलीप राठोड यांनी इंदिरा नगर परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नाल्यातील पाणी रस्त्यावर कशाप्रकारे येत आहे आणि त्यामुळे स्थानिकांच्या घरांचे तसेच दुकानांचे किती नुकसान होत आहे, याची त्यांनी माहिती घेतली. पाहणीनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाल्याचा प्रवाह रस्त्याच्या कामामुळे अडला असेल तर तो तातडीने पूर्ववत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी

केवळ तात्पुरत्या स्वरूपात पाणी काढून प्रश्न मिटवण्याऐवजी नाल्याचा प्रवाह पूर्णपणे मोकळा करून पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. नाल्याचे पाणी पुन्हा रस्त्यावर येणार नाही तसेच नागरिकांच्या घरांमध्ये आणि दुकानांमध्ये शिरणार नाही, यासाठी केडीएमसी प्रशासनाने तातडीने आवश्यक कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करण्यात आली.

‘प्रशासन आणखी किती वेळ शांत बसणार?’

नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये नाल्याचे घाण पाणी शिरत असताना प्रशासन आणखी किती काळ शांत बसणार, असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे. विकासकामे करताना नागरिकांना नव्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर संबंधित कामाचे नियोजन आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या यंत्रणेची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

प्रश्न न सुटल्यास जनआंदोलनाचा इशारा

या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा निघत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेने आता महापालिका प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. इंदिरा नगर परिसरातील नाल्याचा प्रवाह तातडीने मोकळा करून नागरिकांना दिलासा द्यावा. समस्या लवकरात लवकर सोडवली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ॲड. अविनाश शिळकंदे आणि दिलीप राठोड यांनी दिला आहे.

या प्रकारामुळे इंदिरा नगरमधील नालेसफाई, रस्त्याच्या कामाचे नियोजन आणि पाणी निचरा व्यवस्थेबाबत केडीएमसीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता महापालिका प्रशासन या समस्येवर कोणती उपाययोजना करते आणि नागरिकांना कधी दिलासा मिळतो, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

अंगारकी संकष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ट्रॅफिक अलर्ट; वरळीसह दादरमधील वाहतुकीत बदल

Web Title: Titwala indira nagar drain water enters houses shops mns warns kdmc of protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • kalyan
  • KDMC
  • MNS

संबंधित बातम्या

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल
1

KDMC Politics: बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या नरेंद्र पवारांना अटक कधी? वरुण सरदेसाईंचा सवाल

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
2

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
3

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा
4

Kalyan Dombivli: २७ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई, महासभेत कुणाल पाटलांचा प्रशासनाला घेराव, ‘केडीएमसी-म्हाडीकडून तातडीने उपाययोजना करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.