अनेक वर्षापासून नादुरुस्त गटाराचे काम शिवसेना पदाधिकाऱ्याने स्वखर्चातून केलं! नागरीकांनी मानले आभार
कल्याण पूर्व परिसरातील नादुरुस्त गटारांचे काम अनेक वर्षांपासून रखडलं होतं. या गटाराचं कामं लवकरात लवकर पूर्ण करावं, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात होती. या मागणीकडे कोणीही लक्ष दिलं नाही. त्यामुळे आता अखेर अनेक वर्षापासून नादुरुस्त गटाराचे काम शिवसेना पदाधिकारी विशाल पावशे यांनी स्वखर्चातून पूर्ण केलं आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जाणाऱ्या नागरिकांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने कल्याण पूर्वेत कोणता विकास सुरु आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. नादुरुस्त गटारामुळे कल्याण पूर्व येथील नागरिकांच्या घरात सांडपणी घुसत होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता गटार दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
हेदेखील वाचा – बीएमटीसी परिवहन कर्मचाऱ्यांच्या ३६ वर्षांच्या संघर्षाला न्याय द्या अन्यथा उपोषण करणार; पत्रकार मित्र असोसिएशनचा इशारा
सर्व नेत्यांकडे आणि महापालिका प्रशासनाकडे जाऊन हातपाय जोडले. एवढी विनवणी केली. तरी आमच्या परिसरातील गटार दुरुस्तीचे काम पूर्ण झालं नाही. आता शिवसेना पदाधिकारी विशाल पावशे यांनी स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करुन गटार दुरुस्तीचं काम केलं आहे. आता आमच्या घरात सांडपाणी घुसणार नाही. त्यासाठी आम्ही शिवसेना पदाधिकारी विशाल पावशे यांचे आभार मानतो. परंतु विकासाबाबत बोलणारे नेते एक गटार दुरुस्तीचे काम करु शकत नाहीत अशी खंत कल्याण पूर्व येथील नागरीकांनी बोलून दाखविली आहे .
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण पूर्वेतील वीर सावरकर चौकात ३०० मीटर लांब एक मोठे सांडपाण्याचा निचरा होण्याकरीता गटार आहे. पावसाळ्यात आणि अन्य दिवशीही गटार तुंबल्याने सांडपाणी नागरीकांच्या घरात शिरते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. गेल्या १२ वर्षापासून या परिसरातील नागरीक या गटाराने त्रासले होते. नादुरुस्त गटारामुळे कल्याण पूर्व येथील नागरिकांच्या घरात सांडपणी घुसत होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.
हेदेखील वाचा –मुंबई विमानतळावरील प्रवाशाच्या बॅगेत आढळलं धोकादायक रसायन; ग्राउंड स्टाफच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला
याबाबत कल्याण पूर्व येथील नागरिकांनी सांगितलं की, या संदर्भात सर्व पक्षीय नेत्यांची भेट घेतली. केडीएमसी प्रशासनाला वारंवार तक्रार केली. पण तरिही आमच्या गटार दुरुस्तीचे काम झाले नाही. काही दिवसापूर्वी नागरीकांचे एक शिष्टमंडळ शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख आणि माजी नगरसेवक विशाल पावशे यांना भेटले. पावशे यांनी त्याठिकाणी जाऊन त्या परिसराची पाहणी केली. यावेळी नादुरुस्त गटारामुळे नागरीकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांना पाहायला मिळालं. विशाल पावशे यांनी सर्व यंत्रणांकडे याविषयी विचारणी केली. त्यानंतर त्यांनी नागरीकांची व्यथा पाहून स्वखर्चातून या गटाराच्या दुरुस्तीचे काम सुरु केले. हे काम आता अखेर पूर्ण करण्यात आले आहे. गटार दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही.
दरम्यान, वीर सावरकर चौकातील नागरीकांनी पावशे यांचे आभार मानले. गटार दुरुस्तीचे काम सुरु असताना त्याठिकाणी लावलेला बॅनर देखील काही लोकांनी फाडला होता. पावशे यांनी नागरी समस्या सोडविल्याने नागरीकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे