
भास्कर जाधवांनी सांगितला ९५ सालचा तो ऐतिहासिक किस्सा (photo Credit- X)
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिकवण दिली आहे की राजकारण करत असताना समाज किती मोठा यापेक्षा कार्यकर्ता किती प्रामाणिक आहे त्याच्या पाठीमागे तो उभा रहा आणी बाळासाहेब माझ्यामागे उभे राहिले आजतागायत तो प्रसंग मी आजही विसरलो नाही १९९५ साली रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने पाच जागा रत्नागिरी जिल्ह्यातल्या लढवल्या दोन भाजपाला दिल्या. मला उमेदवारी दिली त्यावेळेला तीन आमदार मराठा समाजाचे निवडून दिले होते चौथे राजापूरला पुन्हा आप्पा साळवी यांच्या नावाने मराठा समाजाचा उमेदवार दिला गेला पाचवे याच चिपळूणचे कैलासवासी बापूसाहेब खेडेकर हे निवडून आलेले आमदार होते ते ओबीसी समाजाचे होते त्यावेळेला बैठक झाली त्यावेळी मनोहर जोशी बाळासाहेबांना सांगत होते की निवडून आलेल्या ओबीसी समाजाला आपण जर का डावलले भास्कर जाधवला तिकीट दिलं तर पाचही मराठा उमेदवार होतील आणि बाकीचे लोक आपले उमेदवार पडतील.
Maharashtra Politics: सत्तेसाठी काय पण? निवडणुकीत कट्टर विरोधक येणार एकत्र; इंदापूरचा विषय काय?
तेव्हा बाळासाहेबांनी एकच प्रश्न विचारला पंत भास्कर जाधव कार्यकर्ता आहे की नाही तेव्हा पंतांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इतका लढवय्या इतका अभ्यासू आणि इतका संघर्ष करणारा कार्यकर्ता भास्कर जाधवच्या तोडीस तोड आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नाही मग बाळासाहेबांनी सांगितलं की आज संध्याकाळी मी भास्करच्या नावाची घोषणा करणार आहे. त्यावेळेला मनोहर जोशी साहेब पुन्हा पुन्हा सांगत होते की ओबीसी समाजाचा निवडून आलेला उमेदवार आपण बदलला तर आपली बाकी उमेदवार पडतील मला विरोध म्हणून नाही पण ते सांगत होते. त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले पंत माझ्या आयुष्यामध्ये मला सत्ता आणायची आहे पण कोणाची जात पाहत बघून त्याचं मला कार्य मारायचं नाही आणि हा विचार मी कायम माझ्या मनामध्ये कोरला असा पहिल्यांदी उमेदवारी मिळाली त्यावेळेस मोठा किस्सा भास्कररावांनी जाहीर सभेत सांगितला.
हाच विचार घेऊन मी माझ्या ४२ वर्षाच्या राजकारणात सगळ्या समाजाला मतदारसंघात प्रत्येकाला न्याय दिला कोकणात कुणबी आणि मराठा हा दोनच समाज मोठे आहेत मात्र छोट्या समाजालाही बरोबर घेऊन जाण्याचं काम आपण केलं बहुजन समाजाला आपण संधी दिली सगळ्यांनी एकत्र व्हा धनशक्तीच्या विरोधात आपण जनशक्ती उभी केली आहे असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर टीका करताना यांना निवडणुका घ्यायच्याच नव्हत्या मात्र त्या घ्याव्या लागल्या असं सांगत उद्याचे निवडणुकीमध्ये काय होईल हे सांगता येत नाही मशीन मध्ये हे काही घोटाळा करतील काय लोकांना विकत घेतील काय ही भीती तुमच्या मनामध्ये आहे पण ही भीती बाळगून घरामध्ये राहून चालणार नाही आपल्याला लढावं लागेल असं सांगत ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी भाजपावर जोरदार टीका केली.
कोकणात ‘या’ नेत्यांमध्ये दिलजमाई? आगामी निवडणुका जाधवांच्या नेतृत्वात लढण्याचे आदेश दिल्याने…