Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026:  सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार

मुंबई महापालिकेतील महापौरपद पाच वर्षांसाठी आपल्याकडेच ठेवण्याबाबत भाजप पूर्णपणे ठाम आहे.दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापौर पद  शिंदे गटाला न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jan 21, 2026 | 12:35 PM
BMC Election 2026, Eknath Shinde, Shivsena, BJP Politics,

BMC Election 2026, Eknath Shinde, Shivsena, BJP Politics,

Follow Us
Follow Us:
  • मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे सेनेतील वाटाघाटी
  • आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी
  • मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला  सत्तेत वाटा
 

BMC Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर आता महापालिकांवर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.  मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे सेनेतील वाटाघाटी सुरू आहेत. तर दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणीदेखील होणार आहे.  या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला  सत्तेत वाटा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही भाजपने महापौरपदावर दावा ठोकला आहे. पण त्यानंतरही भाजपकडून नाशिक महापालिकेत शिंदे गटाला वाटा देण्याबाबत तडजोड केली जात असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

मुंबईत भाजप–शिवसेना युती झाली होती. तर नाशिकमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना-राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. पण मुंबईतील महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे गटात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव निवळण्यासाठी भाजपने नाशिकमध्ये तडतोड करण्याची तयारी दाखवली असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये शिंदेंसाठी तडजोड

पण त्याचवेळी मुंबई महापालिकेतील महापौरपद पाच वर्षांसाठी आपल्याकडेच ठेवण्याबाबत भाजप पूर्णपणे ठाम आहे.दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापौर पद  शिंदे गटाला न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण दुसरीकडे मुंबई महापालिकेतील महापौर पदाच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत तडजोड केली जाऊ शकते.

नाशिकमध्ये शिंदे गटाला उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, प्रभाग समित्या व विषय समित्यांची पदे सेनेला दिली जाऊ शकतात. या वाटाघाटी होणार आणखी काही वेगळे निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

मुंबई आणि नाशिक महापालिका: सत्तावाटपाचे नवे समीकरण?*

 मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाटाघाटींनी आता वेग घेतला आहे. मुंबईत भाजपला पाठिंबा दिल्यास, त्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Zilla Parishad Election 2026: जिल्हा परिषदेसाठीही पक्षप्रवेशाचा ट्रेंड सुरू ! शिरुरचे माजी आमदाराचा भाजपमध्ये

मुंबईतील महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या पेच निर्माण झाला आहे. शिवसेना अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाची मागणी करत आहे, तर भाजप पाचही वर्षे हे पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम आहे.

नाशिकमध्ये तडजोडीची शक्यता

नाशिकमध्ये भाजप स्वबळावर सत्तेचा दावा करत असली, तरी मुंबईतील समीकरणांसाठी दोन्ही बाजूंनी तडजोडीचे संकेत दिले आहेत. जर मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिले, तर नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळू शकतो.

नाशिकमधील संभाव्य पदवाटप:

महापौरपद: भाजपकडे राहण्याची दाट शक्यता.

शिवसेनेला मिळणारी संभाव्य पदे: उपमहापौरपद, स्थायी समिती सदस्यत्व, प्रभाग समित्या आणि विविध विषय समित्यांची जबाबदारी.

पुढील काही तासांत दोन्ही शहरांतील सत्तासमीकरणांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या तडजोडीमुळे राज्यातील आगामी राजकारणाला नवी दिशा मिळू शकते.

 

Web Title: Bmc election 2026 nashik in exchange for mumbai eknath shinde is ready to compromise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • BJP Politics
  • BMC Election 2026
  • Eknath Shinde
  • shivsena

संबंधित बातम्या

‘पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाने देशावर उमटवला अमिट ठसा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचे कौतुक
1

‘पंतप्रधान मोदींनी आपल्या नेतृत्वाने देशावर उमटवला अमिट ठसा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मोदींच्या ऐतिहासिक विक्रमाचे कौतुक

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष
2

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष

‘एकनाथ शिंदेजी, राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून…’ वर्षा गायकवाडांचा शिंदेंवर निशाणा
3

‘एकनाथ शिंदेजी, राहुलजींवर टीका करण्याची तुमची पात्रता नाही. दिल्लीसमोर लाचारी पत्करून…’ वर्षा गायकवाडांचा शिंदेंवर निशाणा

‘इंडिया आघाडी गलितगात्र; विरोधकांचे मनोबल खच्ची,’ एकनाथ शिंदेंचा घणाघात; फेसबुक लाईव्हवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा 
4

‘इंडिया आघाडी गलितगात्र; विरोधकांचे मनोबल खच्ची,’ एकनाथ शिंदेंचा घणाघात; फेसबुक लाईव्हवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.