
अधिकाऱ्याला बंदुक दाखवून मारहाण, नंतर गाड्यांची तोडफोड; केडीएमसीच्या कारवाई पथकावर हल्ला
बेकायदा बांधकामाविरोधात कारवाईसाठी गेलेल्या केडीएमसीच्या कारवाई पथकावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. आंबिवलीतील माजी नगरसेवकाने अधिकाऱ्याच्या कानशीलात मारुन बंदुकीचा धाक दाखविला. गाडयांची तोडफोड केली. या प्रकरणात केडीएमसीची नाचक्की झाली आहे. प्रभाग अधिकाऱ्याने गुन्हा न दाखल करता अज्ञातवासात गेला आहे. अखेर त्याने असे का केले ? त्याचे उत्तर कोण देणार ? हा सगळ्यात मोठा सवाल आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेत ६५ बेकायदा इमारतीचा विषय सुरु आहे. केडीएमसीचा दावा आहे की अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई केली जाते. सध्या केडीएमसीच्या आयुक्त पदाचा पदभार अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याकडे आहे. बुधवारी संध्याकाळी वडवली परिसरात एका बेकायदा बांधकामावर केडीएमसीचे पथक कारवाई करण्यासाठी गेले होते. या कारवाई दरम्यान तिथल्या माजी नगरसेवकाने त्याच्या समर्थकांसोबत आला. माझ्या बांधकामाच्या ठीकाणी जाण्याची तुमची हिम्मत कशी झाली. अशी दमदाटी करुन कमरेला लावलेली बंदूक दाखवून धाक दाखविली. एका कर्मचाऱ्याच्या कानशीलात लगावली. कार्यालसमोल गाड्यांची तोडफोड केली. ही बातमी सर्वत्र पसरली. या संदर्भात सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, हा वाद मिटला आहे. आत्ता काही नाही.
अधिकाऱ्यासोबत जो काही प्रकार घडलेलाल प्रकार खरा असल्यास सहाय्यक आयुक्तांनी अद्याप गुन्हा दाखल का केला नाही. या संदर्भात उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी सांगितले की, आम्ही सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा मोबाईल बंद आहे. असे काही घडले असल्यास आम्ही कारवाई करुन संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करु. अखेर इतकी मोठी घटना घडलीनंतर केडीएमसीची नाचक्की झाली आहे. याविषयी महापालिका वर्तुळात चर्चा सुरु आहे.