कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालकाने प्रशासकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे . संचालकांच्य़ा म्हणण्यानुसार आमचं काही चालत नाही त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आम्ही आमच्या पदाचा राजीनामा देतो. संचालकांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच्या म्हणण्यानुसार घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे.एपीएमसीमधील काही लोक बेकायदेशीरपणे आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. असा वाद निर्माण झाल्याने एपीएमसी व्यापारी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये एक भला मोठा भूखंड आहे. हा भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला देण्यात आला आहे.यावरुन एपीएमसी मार्केट संचालक आणि प्रशासकामध्ये वाद निर्माण झाला आहे. एपीएमसीचे सभापती रविंद्र घोडविंदे, संचालक भाऊ गोंधळी यांच्यासह सर्व संचालकांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात एकत्रित येऊन लक्ष्मी मार्केट संघटनेच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले. नियमांचे पालन न करता प्रशासकाकडून हा भूखंड लक्ष्मी मार्केट संघटनेला देण्यात आला आहे जे अतिशय चुकीचे आहे. याचा आम्ही निषेध करतो. एपीएमसीची निवडणूक झाली त्या निवडणूकीत आम्ही निवडून आलो. प्रशासक म्हणतो की आत्तापर्यंत एपीएमसीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे. जर असं असेल तर निवडून आलेल्या सदस्यांचा काय फायदा? लोकशाहीत असे कसे चालणार ? या बाबत संचालक भाऊ गोंधले यानी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन आपल्या पदाचा राजीनामा देणार आहोत.
याबाबत एपीएमसीमधील व्यापारी संघटनेचे नेते गणेश पोखरकर यांनी सांगितले की, प्रशासकाच्या मनमानी कारभाराच्य विरोधात सर्व व्यापारी आंदोलन करणार आहोत. लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेचे सचिव रफिक तांबोळी यांचे म्हणणं आहे की, हे जे संचालक निवडून आले आहे त्यांच्याकडे चार्ज नाही. चार्ज हा प्रशासकाकडे आहे. भूखंडा संदर्भात जी प्रक्रिया केली ती नियमानुसार आहे. काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे करीत आहे. नाव न घेता त्यांनी एकप्रकारे एपीएमसी संचालकावर बोट ठेवले आहे. या प्रकरणामुळे एपीएमसी बाजारपेठ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.