Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रसिक स्वागत यात्रेत सप्तसुरांच्या जल्लोषात न्हाऊन निघाले कल्याणकर

इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 09, 2024 | 11:59 AM
रसिक स्वागत यात्रेत सप्तसुरांच्या जल्लोषात न्हाऊन निघाले कल्याणकर
Follow Us
Follow Us:

कल्याण : कल्याणमधील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला आयोजित सप्तसुरांच्या जल्लोषात कल्याणकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. एकीकडे सुप्रसिद्ध गायक नचिकेत लेले, नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील, मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले आणि अभिनेत्री आदिती सारंगधर या कलाकारांनी एकाहून एक सरस अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याण आणि कल्याण संस्कृती मंचच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कल्याणातील रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त पहिल्यांदाच गेले 3 दिवस विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नववर्ष स्वागतयात्रेच्या पूर्वसंध्येला वासुदेव बळवंत फडके मैदानात जल्लोष सप्तसुरांचा हा अतिशय सुंदर असा सूरमयी कार्यक्रम संपन्न झाला. ज्यामध्ये नचिकेत लेलेच्या गाण्याने, आशिष पाटीलच्या मनमोहक नृत्याने, डॉ. संकेत भोसलेच्या रंजक मिमिक्रीने आणि आदिती सारंगधर या चौघांच्या दिलखेचक अदाकारीने या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

दरम्यान यावेळी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्ताने नयनरम्य अशा फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनीही नागरिकांना 20 मे रोजी मोठ्या संख्येने मतदानाचा आपला हक्क बजावण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, केडीएमसी आयुक्त डॉ इंदूराणी जाखड, कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, नववर्ष स्वागतयात्रा समन्वयक डॉ. प्रशांत पाटील, आयएमए कल्याण अध्यक्ष डॉ. सुरेखा ईटकर, कल्याण संस्कृती मंचचे अध्यक्ष ॲड. निखिल बुधकर कल्याणातील प्रतिष्ठीत संस्था, त्यांचे पदाधिकारी आणि अनेक मान्यवर कल्याणकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kalyankar bathed in the joy of the saptasuras in a romantic welcome procession hindu new year welcome yatras nachiket lele ashish patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Ashish Patil
  • kalyan
  • Maharashtra Government
  • political party
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…
1

Dombivali News : श्रीकांत शिंदेंचा दांडिया रद्द, पण रवींद्र चव्हाणांचा कार्यक्रम सुरू? राजेश कदमांचा थेट सवाल; म्हणाले…

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!
2

Agniveer in Maharashtra Police : अग्निवीरांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा! 25% पोलीस दलात, परीक्षा-ट्रेनिंगची अट नाही!

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु
3

Maharashtra Cabinet Decision : माजी अग्निवीरांना सरकारी नोकरीत 10 % आरक्षण तर दुष्काळाबाबत नवे धोरण लागु

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती
4

Maharashtra Drought Update: पिकांचे पंचनामे आणि अहवालानंतरच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत; बावनकुळेंची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.