Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कल्याणशेट्टींच्या पॅनलने गुलाल उधळला; 13 जागांवर मारली बाजी

ग्रामपंचायत मतदारसंघात दोन्ही पॅनेलला समान संधी मिळाली. याच मतदारसंघात मनीष देशमुख यांच्या निवडणुकीच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात होणार असल्याने सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 28, 2025 | 05:34 PM
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर कल्याणशेट्टींच्या पॅनलने गुलाल उधळला; 13 जागांवर मारली बाजी
Follow Us
Close
Follow Us:
 सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्या पॅनेलने बाजी मारली आहे. या तिघांच्या पॅनेलने सर्वाधिक 13 जागा जिंकून बाजार समितीवर आपला झेंडा रोवला आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, माने – कल्याणशेट्टी हसापुरे पॅनेलने सहकारी संस्थांमधील 11 तथा ग्रामपंचायत व हमाल तोलार मतदारसंघातील प्रत्येकी 1 अशा एकूण 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी गोटातील सुभाष देशमुख गटाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत व्यापारी मतदारसंघातून 2 अपक्ष उमेदवारही निवडून आलेत.
विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीतही सुभाष देशमुख विरोधातच होते. त्यांनी भाजपचे विजयकुमार देशमुख, दिलीप माने, सुरेक्ष हसापुरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळीराम साठे यांच्या पॅनेलला आव्हान दिले होते. त्यावेळी विजयकुमार देशमुख, माने व साठेंच्या पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला भोपळाही फोडता आला नव्हता. पण यावेळी त्यांनी 3 जागा जिंकून बाजार समितीत एन्ट्री केली आहे.
Pakistan Army : पाक लष्करप्रमुखांचा खेळ संपला! हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे अन्…, सैन्यात फूट
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांच्या मदतीने आपले पॅनेल उभे केले होते. त्यांना सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, बळीराम साठे, आणि सिद्धराम म्हेत्रे यांनी एकत्र येऊन प्रतिद्वंदी म्हणून आव्हान दिले होते.
उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार माने, हसापुरे व राजशेखर शिवदारे यांच्या सोबतीने बाजार समितीची निवडणूक लढवली. भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी मात्र काँग्रेससोबतची युती मान्य नसल्याचा दावा करत स्वतंत्रपणे दंड थोपटले होते. पण त्यांना अपयश आले. सोसायटी मतदारसंघ हा माने व हसापुरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्याच्या जोरावरच त्यांनी आतापर्यंत बाजार समितीवर आपले वर्चस्व ठेवले होते. यावेळी पुन्हा तेच झाले.
Jammu Kashmir News: जम्मू-कश्मीरच्या सुंदरबनीमध्ये तीन संशयित…;सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू

ग्रामपंचायत मतदारसंघात दोन्ही पॅनेलला समान संधी मिळाली. याच मतदारसंघात मनीष देशमुख यांच्या निवडणुकीच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात होणार असल्याने सुभाष देशमुख यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. याठिकाणी मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंगची चर्चा होती. उत्तर सोलापूरमध्ये बळीराम साठे आणि जितेंद्र साठे यांनी नान्नज केंद्रावर दिवसभर ठिय्या मांडला होता. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड हे गणेश वानकर यांच्यासाठी दिवसभर उत्तर सोलापूरमध्ये थांबले होते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी, या मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी स्वतःसाठी मत मागितली आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

सहकार संस्था सर्वसाधारण गट
दिलीप माने – 1361
सुरेश हसापुरे – 1355
राजशेखर शिवदारे – 1366
श्रीशैल नरोळे – 1244
उदय पाटील – 1283
प्रथमेश पाटील – 1271
नागप्पा बनसोडे -1280
सहकार संस्था महिला राखीव गट
इंदुमती अलगोंडा – 1327
अनिता विभुते – 1288
सहकार संस्था इतर मागास वर्ग
अविनाश मार्तंडे -1345
सहकार संस्था विमुक्त जाती-भटक्या जमाती
सुभाष पाटोळे -1243
ग्रामपंचायत मतदारसंघ (देशमुख पॅनेल)
मनीष देशमुख -636
रामप्पा चिवडशेट्टी – 615
ग्रामपंचायत मतदारसंघ राखीव
अतुल गायकवाड -589

Web Title: Kalyanshettys panel wins 13 seats in solapur agricultural produce market committee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 05:34 PM

Topics:  

  • BJP
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
2

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत
4

सासवडमध्ये भाजप-शिवसेनेत होणार सामना; जगताप अन् भोंगळे यांच्यात होणार लढत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.