Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समित्यांमध्ये ‘जुन्या-नव्यां’चा संगम; तिन्ही मतदारसंघांचे राजकीय समीकरण साधले

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांच्या निवडीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून 'बेरजेचे राजकारण' केल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 06, 2026 | 03:04 PM
PCMC, Smart City Scam,

PCMC, Smart City Scam,

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समिती सदस्यांच्या निवडीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी निवडणुकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून ‘बेरजेचे राजकारण’ केल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देऊन दोन्ही पक्षांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, सर्व विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड प्रक्रिया पूर्ण होऊन कामकाजाला सुरुवात झाली आहे.

 

पक्षीय बलाबल आणि शिवसेनेची गळती

महानगरपालिकेच्या नियमानुसार स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण आणि क्रीडा-कला-साहित्य-संस्कृती अशा पाच विषय समित्या कार्यरत आहेत. १६ सदस्य असलेल्या प्रभावी स्थायी समितीत संख्याबळानुसार भाजपला ११, राष्ट्रवादीला ४ आणि शिवसेनेला १ जागा मिळाली आहे. मात्र, नऊ सदस्य संख्या असलेल्या अन्य विषय समित्यांमध्ये शिवसेनेला स्थान मिळालेले नाही. प्रत्येक विषय समितीत भाजपचे ६ आणि राष्ट्रवादीचे ३ सदस्य असून, या निवडीत प्रादेशिक समतोल राखण्यावर भर देण्यात आला आहे.

निवडणुकीनंतर कामकाजाला प्रारंभ

सोमवारी सर्व विषय समित्यांच्या अध्यक्षांची निवड झाल्यानंतर गुरुवारपासून पाक्षिक सभांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी शिक्षण समितीची पहिली सभा होणे अपेक्षित होते, परंतु प्रशासकीय तांत्रिक कारणास्तव (कार्यपत्रिका नसल्यामुळे) ही बैठक होऊ शकली नाही. आगामी काळात समित्यांच्या माध्यमातून प्रलंबित विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

विषय समितीनिहाय सदस्य विभागणी

खालील तक्त्यावरून तिन्ही मतदारसंघांना मिळालेले प्रतिनिधित्व स्पष्ट होते

१) समिती :- विधी
पिंपरी :- वर्षा जगताप
चिंचवड :- ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, शेखर चिंचवडे
भोसरी :- सुजाता बोराटे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, तुषार सहाणे

२) समिती :- शहर सुधारणा
पिंपरी :- संजय काटे, वैशाली काळभोर
चिंचवड :- विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, अनंत कोऱ्हाळे
भोसरी :- अर्चना सस्ते, सुहास कांबळे, उत्तम केंदळे, डॉ. वैशाली घोडेकर

३) समिती :- क्रीडा-कला साहित्य व सांस्कृतिक
पिंपरी :- कैलास कुटे, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे
चिंचवड :- शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, भाऊसाहेब भोईर
भोसरी :- उदय गायकवाड, योगेश लांडगे

४) समिती :- शिक्षण समिती
पिंपरी :- प्रियांका कुदळे
चिंचवड :- पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रवीना आंगोळकर, योगिता बारणे
भोसरी :- कविता भोंगाळे, सारिका बोऱ्हाडे, यश साने, रीटा सानप

५) समिती :- महिला व बालकल्याण समिती
पिंपरी :- निकिता कदम, मनीषा लांडे
चिंचवड :- पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ
भोसरी :- राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे, सारिका मासूळकर, शिवानी नरळे

Web Title: Various subject committee members of pimpri chinchwad municipal corporation have been elected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:04 PM

Topics:  

  • BJP
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी
2

Ambernath News: अंबरनाथ पालिकेत भाजप-शिवसेना आमनेसामने; युती तुटण्याची धमकी

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा
3

कचरा कोंडीवरून पिंपरी महापालिकेत रणकंदन; मोशी डेपोला टाळे ठोकण्याचा नगरसेवकांचा इशारा

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई
4

अमली पदार्थांच्या पैशातून उभारलेली 55 लाखांची मालमत्ता गोठवली; पुणे जिल्ह्यात 2026 मधील पहिलीच कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.