Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीबंदीविरोधात कराडात शेतकऱ्यांचा एल्गार; कराड तहसील कार्यालयासमोर निदर्शने, उपसा बंदीचा निर्णय मागे न घेतल्यास जिल्हाभर आंदोलन

कृष्णा आणि कोयना नदीवरील पाणी उपसा बंदी रद्द करण्याच्या मागणीसाठी कराडमध्ये शेतकरी संघटनांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. शेती, पशुधन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था धोक्यात आल्याचा दावा करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 22, 2026 | 09:02 PM
कराड शेतकरी आंदोलन, पाणी उपसा बंदी, कृष्णा नदी, कोयना नदी, सातारा जिल्हा, बळीराजा शेतकरी संघटना, पाणीटंचाई, शेती संकट, तहसील कार्यालय, शेतकरी निदर्शने

कराड शेतकरी आंदोलन, पाणी उपसा बंदी, कृष्णा नदी, कोयना नदी, सातारा जिल्हा, बळीराजा शेतकरी संघटना, पाणीटंचाई, शेती संकट, तहसील कार्यालय, शेतकरी निदर्शने

Follow Us
Follow Us:

कराड/प्रतिनिधी :  कृष्णा आणि कोयना नदीवरील पाणी उपसा बंदीचा आदेश तात्काळ रद्द करून शेती व जनावरांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी कराडमध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला. बळीराजा शेतकरी संघटनेसह विविध शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करत शासनाच्या पाणी धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.

प्रशासकीय कार्यालय परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. वाढत्या पाणीटंचाईमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतीपिके वाचवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी राज्यात विक्रमी पाऊस झाला होता. तरीही जलसंपदा विभागाच्या नियोजनातील त्रुटींमुळे धरणांतील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. परिणामी, उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच धरणसाठा झपाट्याने घटला आणि अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत असून नदीवरील उपसा बंदीमुळे उभी पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट करताना, शेती व पशुधनासाठीही नियोजनबद्ध पाणीपुरवठा होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. पाणीअभावी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा, तसेच चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

यावेळी शिवाजी पाटील, दिगंबर माने, प्रल्हाद माने, विश्वजीत थोरात, संदीप साळुंखे, दीपक पाटील, सुजित पाटील, आबासो पाटील, संजय माळी, रामचंद्र पाटील यांच्यासह विविध गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने पाणी उपसा बंदीचा आदेश त्वरित मागे घेतला नाही आणि शेतीसाठी पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन केले नाही, तर सातारा जिल्हाभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी दिला.

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक

Web Title: Karad farmers protest against water lifting ban demand withdrawal order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Karad news
  • Satara

संबंधित बातम्या

कृष्णा कारखाना निवडणूक; सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ; वाढलेल्या टक्केवारीचा कौल कोणाला, उत्सुकता शिगेला
1

कृष्णा कारखाना निवडणूक; सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ; वाढलेल्या टक्केवारीचा कौल कोणाला, उत्सुकता शिगेला

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक
2

स्मार्ट मीटरविरोधात कराडात जनआक्रोश मोर्चा, वीज कार्यालयावर धडक

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन
3

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन

Satara News : 22 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा, पण पोलिसांच्या भूमिकेवर संशय; ग्रामीण भागात रंगली चर्चा
4

Satara News : 22 शेतकऱ्यांच्या केबल चोरीचा छडा, पण पोलिसांच्या भूमिकेवर संशय; ग्रामीण भागात रंगली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.