Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivendrasinhraje Bhosale : जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर नको! शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप नेत्यांना इशारा

Shivendrasinhraje Bhosale : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर भाजपमधील मतभेद समोर आले आहेत. पराभवाची जबाबदारी आपल्यावर ढकलू नका, असे म्हणत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जयकुमार गोरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 18, 2026 | 07:49 PM
Shivendrasinhraje Bhosale : जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर नको! शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप नेत्यांना इशारा

Shivendrasinhraje Bhosale : जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर नको! शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप नेत्यांना इशारा

Follow Us
Follow Us:
  • भाजपची भूमिका पोहचवण्याचे काम केले
  • राजकीय फायद्यासाठी बँकेचा वापर नको!
  • वरिष्ठांचा निर्णय अंतिम, मग जबाबदारीचे खापर कशाला?
 

Shivendrasinhraje Bhosale : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर महायुतीमधील अंतर्गत मतभेदांची ठिणगी आता भाजपच्या नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांतून स्पष्टपणे दिसू लागली आहे. बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपला सत्तेबाहेर राहावे लागल्यानंतर या घडामोडींची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे राजकारण सुरू झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट करत पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाशी आपण प्रामाणिक राहिलो असल्याचे ठामपणे सांगितले. तसेच, यशाचे श्रेय घ्यायचे आणि अपयशाची वेळ आली की दुसऱ्यांकडे बोट दाखवायचे, ही भूमिका योग्य नसल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना दिला.

जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या वतीने आपल्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेत आपण एकट्याने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक बैठकीला धैर्यशील कदम यांना सोबत ठेवले होते. पक्षाच्या वरिष्ठांची भूमिका काय आहे, याची जाणीव ठेवूनच सर्व राजकीय हालचाली केल्या. मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाचा निर्णय हाच आपल्यासाठी अंतिम होता. त्यापलीकडे जाऊन कोणाशीही स्वतंत्र चर्चा अथवा तडजोड केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपची भूमिका पोहचवण्याचे काम केले

विशेष म्हणजे, सातारा आणि जावळी तालुक्यांतील सुमारे साडेचारशे मतांचे राजकीय महत्त्व लक्षात घेता या भागातील उमेदवारांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. तरीही पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा शब्द पाळण्यासाठी काही जागांवर त्यागाची भूमिका स्वीकारली.
महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांपर्यंत भाजपची भूमिका पोहोचवण्याचे कामही केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी सकाळीही वरिष्ठांचा निरोप मकरंद पाटील आणि शंभूराज देसाई यांच्यापर्यंत पोहोचवला होता. मात्र, त्यानंतरही अपेक्षित राजकीय निर्णय झाला नाही, अशी खंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.

जयकुमार गोरे यांनी निवड प्रक्रियेतील घडामोडींबाबत शिवेंद्रसिंहराजेंनाच विचारा, अशी भूमिका घेतल्याने भाजपमधील समन्वयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवेंद्रसिंहराजे यांनी, ‘झालं तर आमच्यामुळे आणि नाही झालं तर बाबाराजेंना विचारा, अशी भूमिका योग्य नाही,’ असे सांगत नाराजी व्यक्त केली. गोरेंची नाराजी नेमकी कशामुळे आहे, याचे उत्तर त्यांनाच विचारावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Indapur News : तहसीलदारांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एल्गार; २५ नोव्हेंबरला इंदापुरात भव्य मोर्चा

राजकीय फायद्यासाठी बँकेचा वापर नको!

जिल्हा बँकेच्या कारभारात काही त्रुटी किंवा चुकीच्या बाबी असतील, तर संचालकांनी त्याविरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र, संस्थेचा वापर केवळ राजकीय संघर्षासाठी होऊ नये, असे मत शिवेंद्रसिंहराजे यांनी मांडले. सहकारी बँकेच्या हितापेक्षा राजकीय प्रतिष्ठेचे विषय मोठे केले जात असतील, तर ते योग्य नाही, असा त्यांच्या विधानाचा रोख होता.

Bharat Taxi News: भारत टॅक्सी’च्या सारथी बनल्या ३०० महिला; पुण्यात सेवेला वाढता प्रतिसाद; चालकांची संख्या ६० हजारांवर

वरिष्ठांचा निर्णय अंतिम, मग जबाबदारीचे खापर कशाला?

पक्षासाठी काम करताना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाला प्राधान्य देताना आपण कधीही अटी घातल्या नाहीत. पक्षाच्या भूमिकेनुसार जागांचा त्यागही केला. त्यामुळे निवडणुकीतील घडामोडींचे श्रेय घेण्याची वेळ आली की पुढे येणे आणि अपेक्षित निकाल न लागल्यास जबाबदारी दुसऱ्यांवर ढकलणे, हा प्रकार खटकणारा असल्याचे त्यांनी आपल्या वक्तव्यातून सूचित केले. ‘शांत राहून काम केले तर अनेक गोष्टी साध्य होतात; मात्र प्रत्येक वेळी बोलत राहिल्याने काहीच साध्य होत नाही,’ या विधानातूनही त्यांनी राजकीय सहकाऱ्यांना संयमाचा सल्ला दिला.

जिल्हा बँकेतील सत्तांतर हा केवळ अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीपुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. या निमित्ताने भाजपमधील अंतर्गत समन्वय, महायुतीतील निर्णयप्रक्रिया आणि स्थानिक नेत्यांमधील विश्वासाचा प्रश्न पुढे आला आहे. शिवेंद्रसिंहराजे यांच्या जाहीर नाराजीमुळे साताऱ्यातील भाजपच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीनंतर भाजपमध्ये काय वाद सुरू झाला आहे?

    Ans: जिल्हा बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत भाजपला सत्तेबाहेर राहावे लागल्यानंतर या घडामोडींची जबाबदारी कोणाची, यावरून भाजप नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

  • Que: शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काय भूमिका मांडली?

    Ans: जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत आपण पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसारच काम केले. मुख्यमंत्री आणि भाजप नेतृत्वाच्या भूमिकेबाहेर जाऊन कोणताही स्वतंत्र निर्णय घेतला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • Que: शिवेंद्रसिंहराजे यांनी जयकुमार गोरे यांना काय टोला लगावला?

    Ans: ‘झालं तर आमच्यामुळे आणि नाही झालं तर बाबाराजेंना विचारा, अशी भूमिका योग्य नाही,’ असे म्हणत त्यांनी जयकुमार गोरे यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली.

Web Title: Shivendrasinhraje bhosale satara district bank election bjp jaykumar gore rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Jaykumar Gore
  • Satara
  • Shivendraraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका
1

Satara Court Employees Strike : वेतनवाढीचा प्रश्न पेटला; साताऱ्यात न्यायालयीन कामकाजाला कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान
2

Handball Championship : राज्यस्तरीय हॅण्डबॉल स्पर्धेत भंडाराचा डंका! सातारा उपविजेता, नागपूरला तिसरे स्थान

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा
3

Satara News : तारळी प्रकल्पाविरोधात सयाजी शिंदे यांचा एल्गार! अदानींच्या प्रकल्पाची पाहणी करत थेट दिला इशारा

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख
4

Latur News: लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार पॅनेल बहुमताने निवडून येणार: धीरज देशमुख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.