Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad News: भूमिअभिलेख विभागाची पुनर्रचना; कराडच्या प्रशासकीय इमारतीत आजपासूनच नवे कार्यालय कार्यरत

Karad News- सध्या या कार्यालयाचा तात्पुरता कार्यभार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सोपविण्यात आला असून, लवकरच पूर्णवेळ नगर भूमापन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय कार्यरत झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 16, 2026 | 11:59 AM
Karad News, Satara Administration, City Survey, Land Records,

Karad News, Satara Administration, City Survey, Land Records,

Follow Us
Follow Us:

Satara-Karad News: कराड शहर आणि परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जमीन महसूल, भूमापन तसेच मालमत्तांच्या नोंदीसंबंधी सेवा अधिक वेगाने व सुलभपणे मिळाव्यात यासाठी शासनाने कराड येथे स्वतंत्र नगर भूमापन अधिकारी (सिटी सर्व्हे) कार्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या कार्यालयाचे प्रत्यक्ष कामकाज आजपासून सुरू झाले असून, त्यामुळे नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली आहे.

आतापर्यंत शहर आणि ग्रामीण भागातील भूमापन व अभिलेखांची कामे एकाच कार्यालयामार्फत केली जात होती. परिणामी कामांचा मोठा ताण निर्माण होत होता. अर्ज निकाली काढण्यासाठी विलंब होत असल्याने नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने भूमी अभिलेख विभागाची पुनर्रचना करत स्वतंत्र नगर भूमापन अधिकारी कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी कष्ट; विद्यार्थिनींना उचलावी लागली लोखंडी कपाटे

नवीन कार्यालयामुळे शहर व परिसरातील मालमत्ता नोंदी, फेरफार, मोजणी, नकाशे, अभिलेख दुरुस्ती आणि इतर भूमापनाशी संबंधित कामांचा निपटारा अधिक जलद होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या या कार्यालयाचा तात्पुरता कार्यभार उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे सोपविण्यात आला असून, लवकरच पूर्णवेळ नगर भूमापन अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर हे कार्यालय कार्यरत झाले आहे. त्याचबरोबर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या मूळ कार्यक्षेत्रातही बदल करण्यात आले असून काही गावे व सजे नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत.

कराड शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, वाढती बांधकामे आणि मालमत्तांच्या व्यवहारांची संख्या लक्षात घेता स्वतंत्र सिटी सर्व्हे कार्यालयाची गरज प्रकर्षाने जाणवत होती. या निर्णयामुळे प्रशासनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच नागरिकांच्या कामांचा वेगही वाढणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Maharashtra politics : नाशिकमध्ये राजकीय घडामोडींना वेग; विधान परिषद

शहरासह या गावांचा समावेश

या स्वतंत्र सिटी सर्व्हे कार्यालया अंतर्गत

गाव आणि मिळकतींची संख्या; कराड शहर, कार्वे (१२३८), कोपर्डे हवेली (९८६), वडगाव हवेली (११२५), विरवडे (१०३०), करवडी (९५२), वाघेरी (७३६), शेरे (७७९), रेठरे बुद्रुक (१५३६), रेठरे खुर्द (९०७), शेणोली (८२४), वाठार (७०५), आटके (८२५), कालवडे (११८२),

बेलवडे बुद्रुक (७६१), काले (२३३१), कासार शिरंबे (७५३), ओंड (१२५८), नांदगाव (७४४), सवादे (९०१), येळगाव (८४१), तांबवे (१३०४), विंग (१०२०), कोळे (१४८१), कोळेवाडी (७०६), वहागाव (१०२४), इंदोली (१२३८), चरेगाव (९२५),

चोरे (७८३), पाल (१५७८), मसूर (१७२०), हेळगाव (९४१), शामगाव (११०९), शिरवडे (८८७), तळबीड (११२७), उंब्रज (१६२२), बनवडी (७६३), उंडाळे (९१८), मुंढे (८३६), खोडशी (९२२), बेलवडे हवेली (१०४४), सुपने (६१८), गोळेश्वर (६५९),

येरवळे (९९५), चचेगाव (५७३), जखिणवाडी (११८२), नांदलापूर (८०१), चिखली (६९५), कोडोली (९९४), गोवारे (१०४५), सदाशिवगड (१७८१), पेरले (८७३), कापील (६५५), येणपे (८७४), नारायणवाडी (१७८), कोणेगाव (७७३) आणि धोंडेवाडी (६९०) अशी आहे.

 

 

Web Title: Karad gets independent city survey office land and property registration works

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Karad news
  • property deal
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara SC reservation : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी साताऱ्यात उद्या ‘सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा’!
1

Satara SC reservation : अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी साताऱ्यात उद्या ‘सामाजिक न्याय संघर्ष मोर्चा’!

Satara Politics: वाई तालुक्यात बोरीव-आकोशी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?
2

Satara Politics: वाई तालुक्यात बोरीव-आकोशी रस्ता बनला ‘मृत्यूचा सापळा’; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

Masur road accident : गणपतीपुळ्याला निघाल्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
3

Masur road accident : गणपतीपुळ्याला निघाल्या कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती
4

महावितरणच्या आडमुठ्या धोरणामुळे १४ कोटींची ‘जलजीवन योजना’ रखडली; मसूर गावात पाण्यासाठी भटकंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.