Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 27 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कराड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अहेरीतील अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध

नगरपालिकेच्या आवारात एकत्र आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा देत हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यानंतर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन सादर करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 11, 2026 | 11:59 AM
कराड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अहेरीतील अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध;

कराड पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; अहेरीतील अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध;

Follow Us
Follow Us:

कराड : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कराड नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बुधवारी अचानक कामबंद आंदोलन छेडले. काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

नगरपालिकेच्या आवारात एकत्र आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निषेधाच्या घोषणा देत बुधवारी सकाळी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. यानंतर मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन सादर करण्यात आले. शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने सोपविलेली जबाबदारी पार पाडताना अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले ही चिंताजनक बाब असून अशा घटनांमुळे प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत आहे. अहेरी नगरपंचायतीतील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईवेळी संबंधित अधिकाऱ्यावर झालेला हल्ला निषेधार्ह असून, या प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. मागण्यांची दखल न घेतल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक

शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड नगरपालिकेने सोमवारी व्यापक मोहीम राबवत कृष्णा नाका ते बसस्थानक या गजबजलेल्या पट्ट्यात धडक कारवाई केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखंड सुरू होती. या आठ तासांच्या कारवाईत तब्बल ३५ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला.

Web Title: Karad municipal council employees work stoppage protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान
1

‘व्यवस्था सुधारली तरच जनतेचा विश्वास वाढेल’; डॉ. नीलम गोऱ्हेंचे ‘महाराजस्व अभियान’वर मोठे विधान

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड
2

माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्षपदी अभ्यासू युवा नेतृत्व महेश करचे यांची निवड

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
3

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली
4

रस्त्यांवर रम्बलर बसवण्याची घोषणा हवेतच विरली; म्हसवडकरांची प्रतिक्षा कायम राहिली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.