• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Karad Municipality Received Rs 40 Lakhs In The Name Of Taxes

कराड नगरपालिका झाली ‘मालामाल’; कराच्या माध्यमातून तिजोरीत 40 लाख जमा

कर भरल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुकांचा पालिकेत ओघ वाढला आहे. आतापर्यंत अडीचशे अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण दररोज वाढत आहे. पालिकेच्या वतीने प्रमाणपत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 12, 2025 | 11:10 AM
कराड नगरपालिका झाली 'मालामाल'; तिजोरीत 40 लाखांचा कर जमा

कराड नगरपालिका झाली 'मालामाल'; तिजोरीत 40 लाखांचा कर जमा (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कराड : कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्याने अनेकांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पालिका निवडणुकीसाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र (NOC) मिळवण्यासाठी आतापर्यंत सुमारे अडीचशे इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. तर करभरणीसाठी नागरिकांनी स्वयंप्रेरणेने पालिकेत गर्दी केल्याने केवळ चार दिवसांत तब्बल 40 लाख रुपयांचा कर महसूल तिजोरीत जमा झाला आहे.

२०२२ पासून प्रशासकराज असलेल्या कराड नगरपालिकेत गेली अनेक वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा होती. मात्र, निवडणूक जाहीर होताच शहरातील राजकीय गोटे सक्रिय झाले आहेत. विविध पक्ष आणि आघाड्यांच्या चर्चांना वेग आला असून, इच्छुक उमेदवार आपापली तयारी जोरात करत आहेत. निवडणुकीच्या घोषणेनंतर पालिकेचा परिसर नवचैतन्याने गजबजला आहे. यापूर्वी शांत दिसणाऱ्या पालिका इमारतीत आता राजकीय नेते, कार्यकर्ते व इच्छुकांची वर्दळ वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कर भरणे आवश्यक असल्याने अनेक इच्छुकांनी पालिकेच्या कर विभागात रांगा लावल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शनिवार व रविवार सुट्टी असूनही कर वसुली विभाग सुरू ठेवण्यात आला होता.

एरव्ही कर वसुलीसाठी अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या दारात जात असतात; परंतु यावेळी इच्छुक स्वतःहून पालिकेत येऊन कर भरताना दिसत आहेत. या अभूतपूर्व उत्साहामुळे पालिकेच्या तिजोरीत फक्त चार दिवसांत ४० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कर भरण्यासाठी नागरिक येत असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कर भरल्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी इच्छुकांचा पालिकेत ओघ वाढला आहे. आतापर्यंत अडीचशे अर्ज प्राप्त झाले असून हे प्रमाण दररोज वाढत आहे. पालिकेच्या वतीने प्रमाणपत्र तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या निवडणुकीमुळे उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ३१ सदस्यसंख्या असलेल्या नगरपालिकेसाठी उमेदवारी इच्छुकांचा आकडा सध्या अडीचशेच्या वर गेला असून, तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हेदेखील वाचा : निवडणुका जाहीर होताच अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश; कराडमध्ये ‘कमळ’ची घोडदौड वेगवान

Web Title: Karad municipality received rs 40 lakhs in the name of taxes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Karad news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

Feb 14, 2026 | 06:48 PM
Mumbai : पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Mumbai : पाच वर्षांत डीएसए तंत्रज्ञानाचा २११ रुग्णांवर वापर? जोगेश्वरी ट्रॉमा केअरमधील मशीनच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Feb 14, 2026 | 06:30 PM
Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’;  राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Sanjay Raut News: ‘तुम्ही सांगताय की मी सांगू?’; राहुल नार्वेकरांचा व्हिडिओ शेअर करत संजय राऊतांचा खोचक सवाल

Feb 14, 2026 | 06:25 PM
IND Vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोत पावसाची एंट्री, रविवारी रद्द होणार स्फोटक मॅच?

IND Vs PAK: भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोत पावसाची एंट्री, रविवारी रद्द होणार स्फोटक मॅच?

Feb 14, 2026 | 06:25 PM
भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

Feb 14, 2026 | 06:20 PM
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

Feb 14, 2026 | 06:18 PM
रणवीर सिंहनंतर आता Himanshi Khuranaला जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली १० कोटींची मागणी

रणवीर सिंहनंतर आता Himanshi Khuranaला जीवे मारण्याची धमकी, लॉरेन्स बिश्नोई टोळीने केली १० कोटींची मागणी

Feb 14, 2026 | 06:18 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.