Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad Education Workshop : कराडच्या बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रकल्प कार्य व प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

Karad Education Workshop : कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार ‘प्रकल्प कार्य व प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे आवश्यक आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 07, 2026 | 09:35 PM
कराडच्या बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रकल्प कार्य व प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

कराडच्या बापूजी साळुंखे महाविद्यालयात प्रकल्प कार्य व प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

Follow Us
Follow Us:
  • पर्यावरणात प्रत्यक्ष गेल्याशिवाय समस्या समजत नाहीत 
  • नवीन शैक्षणिक धोरण क्रांती घडवणारे 
  • कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला
Karad Education Workshop  : नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्य आणि प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरण, समाज तसेच विविध कार्यक्षेत्रांची वस्तुस्थिती समजण्यास मदत होते. विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षम कौशल्यांच्या विकासासाठी हे दोन्ही घटक अत्यंत महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक प्रो. डॉ. ए. के. पाटील यांनी केले.

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे 5 ऑक्टोबर 2026 रोजी नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार ‘प्रकल्प कार्य व प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

पर्यावरणात प्रत्यक्ष गेल्याशिवाय समस्या समजत नाहीत

प्रा. डॉ. ए. के. पाटील म्हणाले की, केवळ वर्गात बसून आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणात आणि समाजात काय घडत आहे, याची पूर्ण जाणीव विद्यार्थ्यांना होऊ शकत नाही. प्रत्यक्ष प्रकल्प कार्यातून वस्तुस्थिती समजते. पर्यावरणात प्रत्यक्ष गेल्याशिवाय तेथील समस्या समजत नाहीत, तसेच समाजात प्रत्यक्ष काम केल्याशिवाय समाजाच्या वेदना आणि समस्या जाणून घेता येत नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रमातील एखादी समस्या निवडून विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य करणे आवश्यक आहेत.

प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील कामकाजाचा अनुभव मिळतो. औद्योगिक क्षेत्र, बँका, पतसंस्था, वीटभट्टी तसेच इतर विविध व्यवसाय व कार्यक्षेत्रांना भेट देऊन विद्यार्थी तेथील कामकाज समजून घेतात. भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास या प्रशिक्षणाचा मोठा फायदा होतो, असेही त्यांनी सांगितले.

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

नवीन शैक्षणिक धोरण क्रांती घडवणारे

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे यांनी नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवणारे धोरण असल्याचे सांगितले. आधुनिक काळातील आव्हानांना सामोरे जाताना विद्यार्थी स्वयंपूर्ण व्हावा, या उद्देशाने या धोरणानुसार अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील प्रत्येक बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला

कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सुरेश काकडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी करून दिला. आभार प्रा. विश्वनाथ सुतार यांनी मानले, तर सूत्रसंचालन प्रा. ज्योती धर्माधिकारी यांनी केले. आय.क्यू.एस.सी. समन्वयक प्रा. रत्नाकर कोळी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. बी.ए. भाग 3 आणि बी.कॉम. भाग 3 मधील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कार्यशाळेत सहभाग घेतला.

मोठी बातमी ! आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही लवकरच मिळणार पोषण आहार; प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

 

Web Title: Karad nep 2020 project work practical training workshop students sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 09:35 PM

Topics:  

  • Education Board
  • Karad
  • Karad news

संबंधित बातम्या

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर
1

Karad News:कराड उत्तरमध्ये दुष्काळाची पाहणी; काँग्रेसचे बाबुराव पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.