Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karad: चालकाचे नियंत्रण सुटले अन् ट्रॅव्हल्स रस्त्यावर उलटली; पोलिस प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात, १५ जण जखमी

Karad Police Trainees Bus Accident :धुळे येथील २६ पोलिस प्रशिक्षणार्थींना घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल्स कराडजवळील पाडळी-हेळगाव परिसरात पहाटे पलटी झाली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 09:32 PM
Karad Police Trainees Bus Accident

Karad Police Trainees Bus Accident

Follow Us
Follow Us:
  • धुळे ते कोल्हापूर प्रवास ठरला संकटाचा
  • पोलिस प्रशिक्षणार्थींची ट्रॅव्हल्स पलटी
  • १५ जणांना दुखापत
मसूर : धुळ्याच्या पोलिस प्रशिक्षणार्थींना घेऊन कोल्हापूरच्या दिशेने निघालेली ट्रॅव्हल्स पाडळी (हेळगाव), ता. कराड येथील खडकी नावाच्या शिवारात गुरुवारी पहाटे पलटी झाली. कराड – रहिमतपूर मार्गावर शरद जाधव यांच्या शेताजवळ झालेल्या या अपघातात १२ पोलिस प्रशिक्षणार्थींसह चालक, सहचालक व क्लिनर असे एकूण १५ जण जखमी झाले. उसदरवाढीसाठी नागठाणे येथे शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुळे येथील २६ पोलिस प्रशिक्षणार्थींना घेऊन वैभव व राम टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सची एमएच ०९ जीई ९०४५ क्रमांकाची गाडी कोल्हापूरकडे रवाना झाली होती. (Karad News)

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

प्रवासादरम्यान पाडळी-हेळगावच्या हद्दीत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात सुजीत बाळासो कदम, शिवम उत्तम निकम, रुशिकेश दत्तात्रय पाटील, दशरथ धोंडीराम यमकर, विनेश भगवान वायदंडे, पार्थ सुनील चौगुले, आकाश सुरेश घाडगे, तुषार पांडुरंग बर्गे, शुभम वसंत कुंभार, दिगंबर रंगराव चरापले, सागर सत्ताप्पा खामकर व शुभम रामचंद्र कोळी हे १२ पोलिस प्रशिक्षणार्थी जखमी झाले. ट्रॅव्हल्स चालक समाधान लक्ष्मण पाटील, सहचालक मुकुंदा रामलाल व क्लिनर गौरीशंकर सुभाष चौधरी हे जखमी झाले.

जखमींना हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व कराडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस शिपाई अभिषेक शहाजी पाटील (वय २८, मूळ रा. पाडळी खुर्द, ता. करवीर) यांनी मसूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

चालक समाधान लक्ष्मण पाटील (रा. नंदाळे बु., ता. व जि. धुळे) याने वाहन हयगयीने व निष्काळजीपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवल्याने अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. घटनेची माहिती मिळताच मसूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अदिनाथ खरात व पोलिस उपनिरीक्षक एस. एस. भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास व्ही. बी. पोतेकर करीत आहेत.

तुकाराम मुंढेंच्या FDA ची पुण्यात धडक कारवाई! तब्बल ५.२ टन खाद्यपदार्थ ताब्यात तर 559 किलो…

💡

Frequently Asked Questions

  • Que: कराडजवळ पोलिस प्रशिक्षणार्थींच्या ट्रॅव्हल्सचा अपघात कुठे झाला?

    Ans: कराड-रहिमतपूर मार्गावरील पाडळी (हेळगाव) परिसरातील खडकी शिवारात हा अपघात झाला.

  • Que: अपघातात किती जण जखमी झाले?

    Ans: या भीषण अपघातात १२ पोलिस प्रशिक्षणार्थींसह चालक, सहचालक आणि क्लिनर असे एकूण १५ जण जखमी झाले.

  • Que: पोलिस प्रशिक्षणार्थी कुठून प्रवास करत होते?

    Ans: धुळे येथील २६ पोलिस प्रशिक्षणार्थी ट्रॅव्हल्सने कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत होते.

Web Title: Karad police trainees travels bus accident 15 injured pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 09:32 PM

Topics:  

  • Bus Accident
  • Dhule Accident
  • Karad

संबंधित बातम्या

Pakistan Bus Accident : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या समोरासमोर धडकेत 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू
1

Pakistan Bus Accident : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात भीषण अपघात; बस आणि ट्रकच्या समोरासमोर धडकेत 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू

Indore Highway Accident: इंदूर महामार्गावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती! भरधाव बसने दुचाकीला उडवले, अल्पवयीन मुलासह तिघे गंभीर!
2

Indore Highway Accident: इंदूर महामार्गावर काळ आला होता पण वेळ आली नव्हती! भरधाव बसने दुचाकीला उडवले, अल्पवयीन मुलासह तिघे गंभीर!

Satara News: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान;२८ उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त; ९७.९२ टक्के मतदानाचा उच्चांक
3

Satara News: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विक्रमी मतदान;२८ उमेदवारांचे भवितव्य बंदिस्त; ९७.९२ टक्के मतदानाचा उच्चांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.