पुण्यात एफडीएची कारवाई (फोटो -ai gemini)
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ उत्पादक आणि विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली. नारायणगाव येथील भैरवनाथ फूड्समधून ६६६ किलो महिम हलवा आणि बदाम हलवा जप्त करण्यात आला. रावेत येथील माधव मिठासमधून १४२ किलो केसरी पेढा व बालुशाही, तर मुळशीतील सफा अर्शी स्वीट होममधून ९७ किलो सुटी बुंदी जप्त करण्यात आली.
मोशीतील बिकानेर स्वीट्समधून १६० किलो बर्फी, दापोडीतील रुची मिष्ठान भंडारमधून ७० किलो मावा, तर वडगाव बुद्रुक येथील पंचाली स्वीट्समधून चार किलो मोतीचूर लाडू जप्त करण्यात आले. बिबवेवाडीतील सोमेश्वर गौरीप्रसाद पारदेशी यांच्याकडून २०० किलो शेव व बुंदी, शिवणे येथील कन्हैया स्वीट्समधून ५१ किलो बर्फी व बुंदी आणि रावेत येथील बंधन स्वीट्समधून ९१ किलो कलाकंद व पेढा जप्त करण्यात आला. चिंचवडमधील बंधन स्वीट्समधून ११९ किलो मीठा मावा, तर शिरूर येथील हिंदवी एजन्सीमधून ५२ किलो स्वीट हलवा जप्त करण्यात आला.
या कारवाईतील सर्वाधिक मोठा साठा पिंपरी सांदस येथील नायकवाडे डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्समध्ये आढळला. या ठिकाणाहून तीन हजार ९९ किलो खवा जप्त करण्यात आला. त्याची अंदाजे किंमत नऊ लाख २९ हजार ७०० रुपये आहे. काही आस्थापनांमध्ये अस्वच्छता, अयोग्य साठवणूक, खाद्यरंगाच्या वापरासंबंधी त्रुटी आणि आवश्यक परवान्यांचा अभाव आढळून आला.
तुकाराम मुंढेंना धक्का ! थेट मंत्रिमहोदयांनीच बदलला ‘तो’ निर्णय; कारवाईलाच स्थगिती
त्यामुळे संबंधितांवर निलंबनाची तसेच व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आली. नाशवंत आणि संशयित असुरक्षित स्वरूपाचे खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक परवाने व नोंदणी घेऊनच व्यवसाय करावा, उत्पादन व विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता राखावी आणि खाद्यपदार्थांची योग्य साठवणूक व हाताळणी करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Ans: पुण्यात मिठाईचा , खव्याचा ५५९ किलो साठा नष्ट करण्यात आला आहे.
Ans: पिंपरी सांदस येथील एका डेअरीतून तब्बल तीन हजार ९९ किलो खवा जप्त करण्यात आला आहे.






