कर्जत/संतोष पेरणे : माथेरानला जाण्यासाठी असलेल्या एकमेव रस्त्याची दुरवस्था झाली आहे.नेरळ ते माथेरान या सात किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील डांबर निखळून गेले असून वाहनचालक यांना कसरत करावी लागत आहे.दरम्यान नेरळ माथेरान घाटरस्त्याची जबाबदारी असलेले सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी गायब असून खराब झालेल्या रस्त्याकडे पहायला वेळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबई पुणे आणि ठाण्यापासून जवळ असलेल्या या ठिकाणाला भेट द्यायला पर्यटक वर्षाचे बाराही महिने हजेरी लावतात. मात्र एवढं सगळं असूनही प्रशासनाचं याकडे दुलर्क्ष होत असल्याचं दिसून येत आहे. नेरळ ते माथेरान हा रस्ता एकूण नऊ किलोमीटर लांबीचा हा घाट रस्ता आहे.या घाट रस्त्यामध्ये अनेक नागमोडी वळणे आहेत.मात्र हे नागमोडी वळणे पार करून पर्यटकांना आपली स्वतःची कार घेऊन माथेरानला जावे लागते गेले. अनेक दिवस झाले खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसाच्या प्रवाहामध्ये माथेरान घाट रस्ता पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे.
माथेरान घाटात अनेक अपघाती वळणे आहेत,या वळणाच्या ठिकाणी जो रस्ता आहे तो पूर्णपणे नादुरुस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे माथेरान घाटात अनेक आपल्या वेळा आपल्याला अपघात पाहायला मिळाले आहेत.या ठिकाणी हा रस्ता नादुरुस्त अवस्थेत आणि खड्डामुळे वाहतूक करणे धोकादायक बनला आहे. माथेरानमध्ये येणारे पर्यटक हे आपली स्वतःची कार घेऊन या रस्त्यावर जीवघेणा प्रवास करावा लागत आहे हा रस्ता गेले.अनेक दिवस झाले नादुरुस्त अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र या रस्त्याचे काम कधी होणार असा प्रश्न येतील टॅक्सी चालक मालक संघटना आणि माथेरानमध्ये येणारे पर्यटक यांच्याकडून निर्माण झालेला आहे..
माथेरान घाटात जी अपघाती वळणे आहेत या ठिकाणी रस्त्याची दूर अवस्था झालेली आहे या ठिकाणी आमच्यासमोर अनेक अपघात सुद्धा झालेले आहेत मात्र आम्ही अनेक वेळा या रस्त्याचे आमच्या टॅक्सी चालक-मालक संघटनेकडून सहकारसाने काम करत असतो. पावसाचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा रस्ता जास्त वेळ राहत नाही. त्यामुळे या रस्त्यावर कडे प्रशासन लक्ष देणार की नाही असा प्रश्न येतील टॅक्सी चालक-मालक संघटना करत आहे.की या रस्त्यामध्ये अनेक लोकांचे जीव जाणार की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे.