Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत

नेरळ स्थानकाचा कायापालट होत असून प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याच्या उद्देशाने विकासकाम सुरु आहे. मात्र या ही कामं कासवाच्या गतीने पुढे जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Aug 30, 2025 | 04:06 PM
Karjat News : नेरळ स्थानकातील विकासकामाला कासवाचा वेग; दिरंगाईमुळे प्रवाशांनी व्यक्त केली खंत
Follow Us
Close
Follow Us:
  • नेरळ स्थानकातील विकासकामांना दिरंगाई
  • प्रवाशांनी व्यक्त केली खंत
  • वयोवृद्ध प्रवाशांचे होतायत हाल
कर्जत/ संतोष पेरणे : नेरळ स्थानकाचा कायापालट होत असून प्रवाशांना चांगल्या सोयी देण्याच्या उद्देशाने विकासकाम सुरु आहे. मात्र या ही कामं कासवाच्या गतीने पुढे जात असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म 1 च्या मध्यभागी सरकता जिना बसविला जात आहे. या सरकत्या जिन्याचे काम अगदी कासवगतीने सुरू असून स्थानकात एकही सरकता जिना उपलब्ध नसल्याने वयोवृद्ध प्रवासी यांचे हाल होत आहेत.दरम्यान नेरळ स्थानकात फलाट 1 वर मुंबई दिशेकडे उभारण्यात आलेला सरकता जिना लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असून रेल्वे प्रशासन कोणाची वाट पाहत आहे असा सवाल नेरळ प्रवासी संघटना यांनी उपस्थित केला आहे.

मध्य रेल्वे वरील नेरळ जंक्शन स्थानकाचा मेकओव्हर मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरू आहे.मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून नेरळ स्थानकात अनेक विकास कामे सुरू आहेत.त्यात मुंबई कडून उपनगरीय लोकल येत असलेल्या प्लॅटफॉर्म1 वर मुंबईच्या दिशेने सरकता जिना प्रवासी वर्गासाठी सोयीसाठी उभारण्यात आला आहे.या सरकता जिन्यावर एकाच वेळी प्रवासी वर्गाला स्थानकात उतरण्याची आणि स्थानकातून वर जाण्याची सुविधा आहे.मोठ्या प्रमाणावर पर्यटक नेरळ स्थानकातून माथेरान या पर्यटन स्थळी जाण्यासाठी येत असतात. त्यामुळे नेरळ स्थानकात सरकता जिना यापूर्वी होणे आवश्यक होते.मात्र आता हा सरकता जिना बांधून तयार आहे,परंतु तो सरकता जिना अद्याप कार्यान्वित झालेला नाही.दुसरीकडे नेरळ स्थानकात मोठे संख्येने येणारे पर्यटक यांच्यात वयोवृद्ध पर्यटक अधिक संख्येने असतात आणि त्यांना सरकता जिना नसल्याने गैरसोयी ला सामोरे जावे लागते.ही बाब लक्षात घेऊन सरकता जिना उभारण्याची मागणी सातत्याने होत असते.

मात्र त्याचवेळी नेरळ स्थानकाच्या मध्यभागी मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सरकता जिना उभारला जात आहे.या सरकता जिन्याच्या उभारणीचे काम अत्यंत कासवगतीने सुरू असून त्याबाबत नेरळ प्रवासी संघटना यांनी नाराजी व्यक्त केली आहे.नेरळ सारख्या लोकसंख्या वाढीचा वेग प्रचंड असलेल्या मुंबईचे उप नगर म्हणून विकसित होत असलेल्या रेल्वे स्थानकात सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने प्रवासी संघटना नाराज आहे.त्यामुळे मुंबई रेल कॉर्पोरेशन कडून सुरू असलेल्या या कामाबद्दल मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढाकार घ्यावा आणि स्थानकात सुरू असलेली विकास कामे तातडीने मार्गी लावावी अशी मागणी नेरळ प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर तसेच राजेश गायकवाड,मिलिंद विरले, आबासाहेब पवार,प्रभाकर देशमुख,आदी पदाधिकारी यांनी केली आहे.

Web Title: Karjat news development work at neral station at a snails pace passengers express regret over delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2025 | 04:04 PM

Topics:  

  • central railway
  • karjat news
  • Raigad News

संबंधित बातम्या

CSMT-Panvel लोकल प्रवास होणार गारेगार, ‘या’ तारखेपासून हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल
1

CSMT-Panvel लोकल प्रवास होणार गारेगार, ‘या’ तारखेपासून हार्बर मार्गावर धावणार एसी लोकल

Mega Block News : ‘या’ स्थानकात लोकल थांबणार नाही! रविवार मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
2

Mega Block News : ‘या’ स्थानकात लोकल थांबणार नाही! रविवार मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास
3

Karjat Crime : माथेरानमध्ये चाकू–सुऱ्याचा धाक दाखवून चोरी; व्यापारी दाम्पत्याला बांधून दागिने लंपास

Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे
4

Raigad ZP employee benefit: एसबीआयने रायगड जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी खुल्या केल्या विशेष फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.