Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक

चिंचवली डिकसळ या भागातील पाली भूतिवली धरणाला आडोसा असलेली टेकडी फोडण्याचे काम साध्य जोरात सुरू आहे. जेमतेम 300 ते 500 ब्रास माती उत्खनन करण्याची परवानगी घेऊन त्यावर हजारो ब्रास मातीचे त्या भागातून उचलण्यात आली.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 05, 2026 | 02:55 PM
Karjat News : दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन, प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक
Follow Us
Follow Us:
  • दररोज शेकडो ब्रास मातीचे उत्खनन,
  • प्रशासनाच्या भूमिकेवर पर्यावरणप्रेमी आक्रमक
कर्जत/संतोष पेरणे : तालुक्यातील चिंचवली डिकसळ या भागातील पाली भूतिवली धरणाला आडोसा असलेली टेकडी फोडण्याचे काम साध्य जोरात सुरू आहे. जेमतेम 300 ते 500 ब्रास माती उत्खनन करण्याची परवानगी घेऊन त्यावर हजारो ब्रास मातीचे त्या भागातून उचलण्यात आली आहे.दरम्यान,महसूल विभागाने त्या ठिकाणावरून उचलल्या जाणाऱ्या शेकडो ब्रास मातीबद्दल कारवाई करावी अशी मागणी होत आहे. तर रेल्वे मार्गावर टाकण्यात आलेली माती किंवा खोदण्यात आलेला डोंगर यांची मोजदाद करावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी तसेच नैसर्गिक नाला बंद करण्यात आला आहे. याची चौकशी करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी यांनी केली आहे.

कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर चिंचवली डिकसळ येथे असलेल्या पाली भूतिवली धरणाला सुरक्षा म्हणून आडोसा समजला जाणारा डोंगर फोडण्यास सुरुवात झाली आहे.लया ठिकाणच्या शेतकरी यांनी आपल्या जमिनीमधील माती काढण्यास परवानगी दिली आहे.मात्र तेथील जमीन ही डोंगर भागातील आणि तीव्र चढउताराची आहे.त्याचा मोठा परिणाम पावसाच्या पाण्याची नैसर्गिक विल्हेवाट लावणारी आहे.परंतु आता संबंधित जमीन सपाटीकरण करण्यासाठी महसूल विभागाकडे स्वामित्व शुल्क भरले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जेमतेम 300 ते 500 ब्रास मातीचे उत्खनन करण्याची परवानगी संबंधित शेतकरी यांनी घेतली आहे. पण सदर जमिनीमधून दररोज काही शे ब्रास माती उचलून कर्जत रेल्वे कारशेड कामासाठी भराव म्हणून नेली जात आहे.त्यामुळे महसूल विभागाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम संबंधित शेतकरी यांच्याकडून सुरू आहे.तेथे शेतकरी हा आपली जमीन सपाटीकरण करण्याचे नावाखाली डोंगर फोडत असून याबद्दल पर्यावरण प्रेमी यांनी संताप व्यक्त केला आहे.

Karjat News : बिल्डरची दादागिरी अन् गृह प्रकल्पाचा मनस्ताप; सांडपाण्यामुळे शेतकऱ्यांची जमीन होतेय उद्ध्वस्त

डोंगर फोडून माती उत्खनन सुरू असताना महसूल विभाग गप्प असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. डोंगर फोडलेली माती ही जमीन सपाटीकरण करण्यासाठी अन्य ठिकाणी नेली जात असल्याने तेथे दिवसभर आणि रात्री देखील मातीचे ट्रॅक दिवसरात्र सुरू असतात. त्यामुळे केवळ 300 ते 500 ब्रास मातीचे परवानगी स्वामित्व शुल्क भरून मिळवली आहे,पण आतापर्यंत हजारो ब्रास माती तेथून नेली गेली आहे.याची मोजदाद महसूल विभाग घेणार आहे की नाही? असा प्रश्न समोर आला आहे.महसूल विभागाने यावर कारवाईचा कोणताही बडगा उगारला नाही तर मात्र पाली भूतिवली धरण लवकरच रेल्वे स्थानकातून दिसू लागले एवढे जलद काम सध्या डोंगर फोडण्याचे सुरू आहे.

दुसरीकडे या भागात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे वास्तव्य होते. आता तेथे झाडे राहणार नसल्याचे पावसाळ्यात नजरेस पडणारे मोर देखील दिसेनासा होऊ शकतात. मात्र या डोंगर फोडण्याचे कामामुळे तेथून नैसर्गिक नाला बंद झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरातून येणारे पाणी कुठूनही वाहून जाऊ शकते. हे वाहणारे पाणी कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्ता आणि ती भागातील अनेकांचे घरात घुसू शकते.ही बाब लक्षात घेऊन महसूल विभागाने डोंगर फोडण्याचे काम थांबवावे आणि तेथील निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबवावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी करीत आहेत. डोंगर फोडण्याचे काम असेच सुरू राहिल्यास त्या भागातील निसर्ग संपदा लयास जाऊ शकते तसेच धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. रेल्वे मार्गासाठी माती नेण्यासाठी शेतकरी डोंगर फोडत असतील आणि त्यासाठी जेमतेम आणि किरकोळ स्वरूपात माती काढण्याचा स्वामित्व शुल्क भरत असतील. तर ही शासनाची फसवणूक असून शासनाने तत्काळ त्या माती उत्खनन आणि डोंगर फोडण्याबाबत केलेल्या मातीचे पंचनामे करावेत आणि दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. त्याचवेळी शासनाने ही मागणी मान्य केली नाही तर आम्हाला शासनाच्या वरिष्ठ स्तरावर न्यायासाठी जावे लागेल असा इशारा पर्यावरण प्रेमी आणि मानवाधिकार कार्यकर्ते गोरख शेप यांनी दिला आहे.

Karjat News : लाखो पक्षी घर, तरीही प्रशासन मूग गिळून गप्प; जंगल तोडीमुळे औषधी वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर

 

Web Title: Karjat news hundreds of tons of soil are being excavated every day environmentalists are aggressive against the administrations role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज?  नेमका काय प्लॅन?
1

India-Russia Deal : भारताची रशियाला महाऑफर! रशियन जमिनीवरून करणार गेम चेंज? नेमका काय प्लॅन?

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान
2

India-US Trade Deal: भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण होणार; पीयूष गोयल यांची महत्त्वपूर्ण विधान

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं
3

LPG Price Hike: झटका बसणार… LPG सिलेंडर आणखी महागणार, केंद्र सरकारने कारण देत थेटच सांगितलं

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला
4

SBI Chairman Statement : ‘केवळ Sensex कडे पाहू नका…’ SBI अध्यक्षांचा गुंतवणूकदारांना मोलाचा सल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.