Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : शासकीय योजनेतील ‘समाधान’कारक शिबिर ; महाराजस्व अभियानात 870 लाभार्थ्यांना लाभ

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात कळंब परिसरातील आदिवासी लोकांनी मोठा सहभाग दिसून आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 12:35 PM
Karjat News : शासकीय योजनेतील ‘समाधान’कारक शिबिर ; महाराजस्व अभियानात 870 लाभार्थ्यांना लाभ
Follow Us
Close
Follow Us:
  • शासकीय योजनेतील ‘समाधान’कारक शिबिर
  • महाराजस्व अभियानात 870 लाभार्थ्यांना लाभ
कर्जत : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात कळंब परिसरातील आदिवासी लोकांनी मोठा सहभाग दिसून आला. तब्बल 870 लाभार्थ्यांनी विविध प्रकारचे शासकीय दाखले मिळविण्यासाठी गर्दी केली होती. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरामुळे लाभार्थींचे समाधान होत असल्याचा दावा तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी केला.यावेळी भूमी अभिलेख कडून गावठाण हद्द मोजणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कर्जत तालुक्यातील तिसरे महा राजस्व अभियान कळंब येथे आयोजित केले होते.कर्जत तालुक्यातील महसूल मंडल कळंब येथे दिनांक 10 मार्च 2026 रोजी प्रगती माध्यमिक विद्यालय कळंब येथे ही समाधान शिबिर आयोजित केले होते.या शिबिराची सुरुवात तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव आणि रायगड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण समितीचे सभापती नारायण डामसे यांच्याहस्ते झाले.यावेळी पंचायत समितीच्या सदस्या रेश्मा जोशी,भूमिअभिलेख उप अधीक्षक नितीन आटाळे,तालुका पुरवठा अधिकारी दळवी तसेच माजी सरपंच आवेश जूवारी,रविंद्र झांजे यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.

निवासी नायब तहसीलदार नितीन राऊत आणि मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांनी उपस्थितींचे स्वागत केले. या शिबिरामध्ये लाभार्थींना रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनल दाखले, तसेच नवीन रेशन कार्ड, दुय्यम रेशन कार्ड, देण्यात आले. तसेच संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्थसहाय्य योजनेचा लाभ,नवीन आधार कार्ड दुरुस्ती सातबारा दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले.या समाधान शिबिराचे निमित्ताने कळंब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वतीने आरोग्य शिबिर आयोजित केले होते.तर भूमी अभिलेख कडून गावांमधील गावठाण सीमा निश्चित करण्यासाठी ड्रोन मोजणीचा शुभारंभ करण्यात आला.तर लाभार्थ्यांना केसरी आणि पिवळे रेशन कार्ड,जिवंत सातबारा,फेरफार उतारे,आदिवास दाखल,वयाचा दाखला, सातबारा आणि आठ ‘अ’ वाटप,आधार कार्ड दुरुस्ती,स्त्रियांच्या मालकी हक्कांची नोंद आदी कामे करून देण्यात आली.

या शिबिरात कळंब भागातील लाभार्थ्यांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले तर लाभार्थ्यांकडून विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी 870 अर्ज दाखल झाले. यावेळी उपस्थित यांच्याशी संवाद साधताना महाराजस्व अभियानात सर्वांना एकाच ठिकाणी दाखले देण्याची सरकारची योजना आहे.कळंब येथील तालुक्याच्या तिसऱ्या महाराजस्व अभियानाला जमलेली गर्दी यामुळे ही शिबिर यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.त्यात मंडळ अधिकारी संतोष जांभळे यांचे मोठे योगदान असल्याचे जाहीर केले.त्यावेळी हे शिबिर यशस्वी होण्यासाठी ग्राम महसूल अधिकारी निलेश पवार,आकाश निफाळे,रणजीत कोळेकर,शशिकांत हुशगुंडे,वंदना कांबळे,मोहिनी भडांगे,यांचा महत्वाचा सहभाग होता.

मुंबईत सीटी स्कॅन अहवालांवर मोठा घोटाळा? स्कॅन स्वाक्षऱ्या आणि नोंदणी क्रमांकात विसंगतीचे धक्कादायक आरोप

राज्य लोकसेवा आयोग कडून यशस्वी ठरलेल्या आदिवासी तरुण नवीन वाघ यांचा पोलिस उप निरीक्षक झाल्याबद्दल कौतुक करण्यात आले.

समाधान शिबिर – मंडळ कळंब
महसूल विभाग
उत्पन्नाचा दाखला: 276
जात प्रमाणपत्र: 108
अधिवास प्रमाणपत्र: 96
आधार कार्ड: 12
भूमि अभिलेख आकारपोट पत्र: 1
कृषी व इतर योजना
पीएम किसान: 23
महाडीबीटी: 7
ऍग्री स्टॅक: 72
निवडणूक विभाग
फॉर्म क्रमांक 8: 2
सामाजिक योजना
संजय गांधी निराधार योजना: 48
पुरवठा विभाग
एकूण लाभार्थी: 86
आरोग्य विभाग
चेस्ट एक्स-रे: 11
डोळे तपासणी: 42
सिकल सेल अ‍ॅनिमिया: 29
एचबी (HB): 53
सर्वसाधारण आरोग्य तपासणी: 57
एकूण लाभार्थी: 870  असं एकंदरितच या योजनेमुळे लाभार्थ्यांना याचा फायदा मिळाल्याने समाधानकारक बाब असल्याचं म्हटलं जात आहे.

Naresh Mhaske : ‘खासदार फुटणार’ या खोट्या बातम्यांचे उबाठाचेच नेते सूत्रधार, खासदार नरेश म्हस्के यांची घणाघाती टीका

 

 

Web Title: Karjat news samadhaan camp in government scheme 870 beneficiaries benefit from maharajswam abhiyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • karjat news
  • Marathi News
  • Raigad News

संबंधित बातम्या

Petrol – Diesel स्वस्त होणार? रिफायनरींच्या नफ्यावर सरकारने घातली मर्यादा; इंधन नुकसानभरपाईसाठी मोठा निर्णय
1

Petrol – Diesel स्वस्त होणार? रिफायनरींच्या नफ्यावर सरकारने घातली मर्यादा; इंधन नुकसानभरपाईसाठी मोठा निर्णय

Startup ना Kotak कडून मदतीचा हात! ‘Kotak BizLabs’साठी 71 कंपन्यांची निवड;  मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं अनुदान
2

Startup ना Kotak कडून मदतीचा हात! ‘Kotak BizLabs’साठी 71 कंपन्यांची निवड; मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचं अनुदान

Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग
3

Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग

PPF Fund ला हातही न लावता तुम्हाला मिळणार पैसा? ‘ही’ आहे खास ट्रीक, जाणून घ्या सविस्तर
4

PPF Fund ला हातही न लावता तुम्हाला मिळणार पैसा? ‘ही’ आहे खास ट्रीक, जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.