Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग

शुक्रावारची रात्र मिरा भाईंदरकरांसाठी काळरात्र होती.  एकाच दिवशी सलग दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगींमुळे संपूर्ण शहर हादरून गेले .

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 02:00 PM
Mira Bhayander : “काळ आला पण वेळ नाही”; परिसरात दुहेरी संकट, एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग
Follow Us
Follow Us:
  • परिसरात दुहेरी अग्नीतांडव
  • एकाच दिवशी दोन ठिकाणी भीषण आग
  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
मीरा-भाईंदर /विजय काते : शुक्रावारची रात्र मिरा भाईंदरकरांसाठी काळरात्र होती.  एकाच दिवशी सलग दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या भीषण आगींमुळे संपूर्ण शहर हादरून गेले. वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

पहिली घटना भाईंदर पश्चिमेतील लोधा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील इंद्रलोक फेस-4 परिसरात घडली. येथे मोकळ्या जागेत अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीला अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण झोपडपट्टीला वेढा घातला. आग इतकी भीषण होती की, झोपड्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या घरगुती गॅस सिलेंडरचे एकामागोमाग स्फोट होऊ लागल्याने परिसर दणाणून गेला. या स्फोटांमुळे नागरिकांनी घाबरून घराबाहेर धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून जवानांकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न केले.

मीरा रोड येथे उभारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पूर्णाकृती पुतळा! मंत्री संजय शिरसाट यांचे तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश

पहिल्या घटनेची धामधूम सुरू असतानाच दुसरी आग लागल्याची घटना काशिमीरा येथील दर्गा रोडवरील मशिदीजवळ घडली. अचानक लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले.

विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून मीरा-भाईंदर शहरात सातत्याने आगीच्या घटना घडत असून शहरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. कधी अनधिकृत झोपडपट्ट्या, तर कधी अनधिकृत फर्निचर गाळे, गोदामे आणि व्यावसायिक आस्थापनांमधून अशा दुर्घटना घडत असल्याने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार,  “शहरात अनधिकृत बांधकामं आणि धोकादायक व्यवसायांवर कारवाई होत नसल्यानेच अशा घटना वारंवार घडत आहेत. प्रशासनाने वेळेत उपाययोजना केल्या नाहीत तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,” असा इशारा दिला आहे. दरम्यान, दोन्ही घटनांमध्ये नेमके किती नुकसान झाले आणि जीवितहानी झाली आहे का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे.

Mira Bhayander : ठेकेदारांविरोधात घोषणाबाजी; स्मशानभूमीतील कंत्राटी कामगारांचे तिरडी आंदोलन

Web Title: Mira bhayander double trouble in the area two major fires in two places on the same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Fire News
  • Marathi News
  • Mira Bhayandar Municipal Corporation
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर
1

Anil Kapoor: अनिल कपूर यांचा कव्वाली लुक आणि एनर्जीचा धमाका, ‘इंडियाज टॉप 1%’ चं नवं टीझर आलं समोर

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा
2

“Are We Muslims?”Javed Akhtar: ‘आपण मुस्लिम आहोत का?’ फरहानच्या त्या एका प्रश्नाने घरात काय घडलं? वाचा भन्नाट किस्सा

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत
3

Avadhoot Gupte: ‘हा धंदा विद्यानंदा…’ पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेंनी गायले भन्नाट गाणे; VIDEO चर्चेत

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….
4

Unfolds Across 2 Seasons: बाप-लेकाचं नातं पाहून डोळे पाणावतील! IMDbवर 7.9 रेटिंग असलेली ‘ही’ सीरिज या विकेंडला नक्की पाहा….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.