
Karmala leopard cubs found in sugarcane field
वनरक्षकाने मात्र बिबट्याच्या पकडलेल्या पिल्लाला उसाच्या शेतात मोकळ्या कॅरेट मध्ये ठेवून आजूबाजूला सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे कदाचित त्या पिल्लाला पाहून त्या पिल्लाची आई येण्याची दाट शक्यता असल्यामुळे सीसीटीव्ही वनरक्षकाने लावली आहे ऊसतोड कामगारांना अचानकपणे बिबट्याची पिल्ले आढळल्याने वीट गावात तसेच परिसरात एकच घबराटीचे वातावरण पसरले आहे सध्या बिबट्याला जन्म देणाऱ्या मादीला पकडण्यासाठी वनरक्षकाने सदर भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहे असे ग्रामस्थांनी बोलताना सांगितले आहे पश्चिम भागातील वीट गावात अचानक पणे बिबट्याची पिल्ले आढळल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्रीच्या वेळी वीट परिसरातील शेतकरी सध्या तरी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामे काळजीपूर्व करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.
वीट परिसरातील त्या बिबट्याच्या शोध घेण्यासाठी वनखात्याने आता पिंजरा लावणे आवश्यक आहे तेव्हा वन खात्याने त्वरित त्या पिल्लाच्या आईला पकडण्यासाठी त्वरित पिंजरा लावावा अशी मागणी बाबू ढेरे या ग्रामस्थांनी केली आहे.
चारा-पाणी नियोजनावर लक्ष द्यावे, देऊळगाव राजात पाणीटंचाईचे सावट; आमदार मनोज कायंदेंनी दिले निर्देश