Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karuna Sharma on Dhananjay Munde: ‘… म्हणून मला मान्यता दिली आहे’; कोर्टाच्या निकालानंतर करुणा शर्मांची प्रतिक्रिया

राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2025 | 04:28 PM
Karuna Sharma on Dhananjay Munde: '...म्हणून मला मान्यता दिली आहे; कोर्टाच्या निकालानंतर करुणा शर्मांची प्रतिक्रिया

Karuna Sharma on Dhananjay Munde: '...म्हणून मला मान्यता दिली आहे; कोर्टाच्या निकालानंतर करुणा शर्मांची प्रतिक्रिया

Follow Us
Close
Follow Us:

Karuna Sharma: राज्याचे मंत्री व अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात आवाज उठवला होता. यामध्ये करुणा मुंडे यांना कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी ठरवले आहे. करुणा शर्मा यांनी दरमहा 15  लाख रुपये पोटगी देण्याची मागणी केली होती. मात्र कोर्टाने दिलासा दिल्यानंतर करुणा शर्मा यांना दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने मंत्री धनंजय मुंडे यांना दिले आहे. यावर आता करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोर्टाच्या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. करुणा शर्मा म्हणाल्या, ‘कोर्टाने पहिली बायको म्हणून मला मान्यता दिली आहे. मी लढा दिला आहे. यासाठी मोठी किंमत चुकवली आहे. गेले तीन वर्ष मी लढा देत आहे. मला करुणा शर्मा नाही तर मला करुणा मुंडे म्हणा. मी न्यायाधीश, कोर्ट आणि माझे वकील यांचे मनापासून आभार मानते.

कोर्टाने 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय दिला. त्यावर बोलताना करुणा शर्मा म्हणाल्या, ‘कोर्टाच्या ऑर्डरवर मी समाधानी नाही. आम्हाला महिन्याच्या खर्चासाठी 15 लाख महिन्याला हवेत. त्यामुळे मी हायकोर्टात दाद मागणार आहे.’ कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. कोर्टाने धनंजय मुंडे यांना मोठा धक्का दिला असून यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

हेही वाचा: Karuna Dhananjay Munde : मंत्री धनंजय मुंडे घरगुती हिंसाचारामध्ये दोषी; करुणा मुंडेना दरमहा एवढी पोटगी

धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. घरगुती हिंसाचाराचे आरोप करुणा मुंडे यांनी गंभीर आरोप केले होते. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयामध्ये हिंसाचाराची केस दाखल केली होती. यामध्ये कोर्टाने धनंजय मुंडे यांना धक्का दिला आहे. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडेंना दोषी ठरवले आहे. करुणा मुंडे यांचे आरोप कोर्टाने स्वीकारले आहेत.

धनंजय मुंडे यांच्या पूर्व पत्नी करुणा मुंडे यांनी एका वाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कौटुंबिक न्यायालयाचे आभार मानले आहेत. करुणा मुंडे म्हणाल्या की, “न्यायालयाचे मी खूप आभार मानते. आज सत्याचा विजय झाला आहे. लोकांना असं वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळाला आहे. औरंगाबाद कोर्टामध्ये देखील माझा विजय झाला होता. आता वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील माझा विजय झाला आहे. त्यामुळे न्यायालयाचे आणि न्यायाधीश यांचे आभार मानते,” असे मत करुणा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Karuna sharma first reaction after court decision about alimony dhananjay munde case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 04:26 PM

Topics:  

  • dhananjay munde
  • High court
  • karuna munde

संबंधित बातम्या

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय
1

Dhar Bhojshala Case : नमाजवर बंदी, तर हिंदूंना पुजेचा अधिकार; धार भोजशाळा प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.