Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vadgaon News : मूलभूत सुविधांसाठी वडगावमधील नंदीवाले समाजाचा लढा; आधार, रेशन, मतदान हक्कांपासून वंचित

Vadgaon News : खंडाळा तालुक्यातील वडगावमध्ये गेल्या १६ वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नंदीवाले समाजातील नऊ कुटुंबे पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. आधार, रेशन कार्ड, मतदान हक्क आणि घरकुल योजनांसह मूलभूत सुविधाही त्यांना मिळालेल्या नाहित.

  • By स्वराली शहा
Updated On: May 19, 2026 | 05:30 PM
Vadgon News

Vadgon News

Follow Us
Follow Us:
  • मूलभूत सुविधांसाठी वडगावमधील नंदीवाले समाजाचा लढा
  • आधार, रेशन, मतदान हक्कांपासून वंचित
  • मुलांचे शिक्षणही धोक्यात
Vadgaon News in Marathi : वडगांव ता. खंडाळा येथे राहणाऱ्या नंदीवाले समाज बांधवांना मूलभूत सुविधा मिळाव्यात या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांना वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नंदीवाले समाजातील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी श्री.खरमाटे यांची भेट घेवुन आपल्या व्यथा मांडत. निवेदन देण्यात आले.यावेळी अरुण गायकवाड, विजय लोंढे,रामभाऊ वाघमोडे यांच्यासह सोयी सुविधा आणि कागदपत्रां पासून वंचित नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा : PM Kisan Yojana: पीएम किसानचा २३वा हप्ता कधी येणार? ‘ही’ ३ महत्त्वाची कामे पूर्ण नसतील तर अडकणार २ हजार रुपये?

प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,गेली सोळा वर्षांपासून वडगांव ता. खंडाळा येथे नंदीवाले समाजातील ९ कुटुंबे मोलमजूरी करून, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. परंतु तालुक्यातील वडगावमध्ये सोळा वर्षे वास्तव्य करणाऱ्या या कुटुंबातील नागरिकांना आधार कार्ड,रेशनिंग कार्ड, मिळाले नसून मतदार यादीमध्ये नावनोंदणी करून न घेतल्यामूळे मतदानाच्या राष्ट्रीय हक्‌कापासून वंचित ठेवण्यात आले आहे. सदर कागदपत्रांसाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी अशा अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना सतत विनंती करून ही या नागरिकांना कागदपत्रांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्षित ठेवण्यात आले आहे.

यामुळे या कुटुंबातील मुलांना जातीचे दाखले मिळत नसल्यामुळे शैक्षणिक सुविधांपासून पर्यायाने नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे.अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक कागदपत्रे न दिल्यामूळे या कुटुंबांना घरकुल योजना,सुविध मिळत नाही.त्यामूळे गेली १६ वर्षांपासून ही कुटुंबे गायरान जागेत कुडाच्या छपरामध्ये आपल्या लहान मुलांसह राहतात. तसेच वंचित भटक्या नंदीवाले समाज बांधवांना घरासाठी राहत असलेली जागा उपलब्ध करून मिळावी अशी मागणीही निवेदनाव्दारे केली आहे.

हे देखील वाचा :  Satara news : शाहू कलामंदिर की ठेकेदारांचा अड्डा? लाखो खर्चूनही सुविधा गायब? मनुष्यबळ व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह

Web Title: Khandala vadgaon nandiwale community basic rights issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 05:30 PM

Topics:  

  • khandala news
  • Marathi News

संबंधित बातम्या

South Africa News : स्थलांतरविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; २४ गाड्या जाळल्या, परदेशी नागरिकांच्या दुकानांची लूट
1

South Africa News : स्थलांतरविरोधी आंदोलनाला हिंसक वळण; २४ गाड्या जाळल्या, परदेशी नागरिकांच्या दुकानांची लूट

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट
2

Hungary News : हंगेरीमध्ये १२६ वर्षांतील सर्वाधिक तीव्र दुष्काळ; शेती, पाणीपुरवठा आणि ऊर्जा क्षेत्रावर संकट

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला
3

Russia-Ukraine : युक्रेनचा रशियाच्या मोठ्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर ड्रोन हल्ला

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा
4

World News : अमेरिकेच्या आखाती किनारपट्टीवर ‘इसायस’ चक्रीवादळाचे संकट; लाखो नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.