Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kisan Agri Expo: शेतकऱ्यांसाठी कृषी उत्सव! मोशीत किसान कृषी प्रदर्शनाला सुरुवात; ३० एकरावर ६०० कंपन्यांची गर्दी

प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करण्याची सोय आहे. ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 10, 2025 | 04:59 PM
Moshi International Exhibition Centre

Moshi International Exhibition Centre

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील सर्वात मोठ्या  किसान कृषी प्रदर्शनाला सुरुवात
  • किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या
  • किसान जागर हा शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृतीसाठी विशेष उपक्रम
Kisan Agri Expo: भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या किसान या कृषी प्रदर्शनाचे पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी येथे प्रदर्शन स्थळी पहिल्या भेट देणाऱ्या शेतकर्‍यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक १० ते १४ डिसेंबर २०२५ दरम्यान सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरु राहणार आहे. हे किसान मालिकेतील ३३ वे कृषी प्रदर्शन असून या वर्षी प्रदर्शन ३० एकरावर विस्तारीत आहे. (Agricultural News)

किसान प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनाच्या कालावधीत देशभरातून दोन लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

IAS Tukaram Mundhe : 20 वर्षात तब्बल 24 वेळा बदली; आता तर थेट राजीनाम्याची मागणी, ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं

यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ उद्योगातील कंपन्यांचे स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत आयोजित केले आहे.
किसान प्रदर्शनाला भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचा सहभाग लाभला आहे. तसेच कृषी विभाग महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर संस्थांचाही सहभाग आहे. (Farmers News)

पूर्वनोंदणी : प्रदर्शनाची पूर्वनोंदणी मोबाईलद्वारे करण्याची सोय आहे. ३०,००० हुन अधिक शेतकऱ्यांनी पूर्वनोंदणी केली असून ही संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

किसान आता मोबाईलवरसुद्धा – प्रत्यक्ष प्रदर्शनातील सहभागासोबतच प्रदर्शक कंपन्या किसान डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या उत्पादनांची यादी प्रसिद्ध करू शकतात. या माध्यमातून प्रदर्शकांची माहिती देशाच्या कानाकोपऱ्यातील १० लाख शेतकऱ्यांपर्यंत पाहोचवण्याचे योजले आहे. या शेतकऱ्यांना अधिक माहितीसाठी कंपन्यांशी संवाद साधणे शक्य होईल.

जागर : किसान जागर हा शेतीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू केलेला एक विशेष उपक्रम आहे.

मातीमोल : मातीच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा उपक्रम योजला आहे. आपली माती जिवंत आहे का? याविषयी विचार करायला उद्युक्त करणे व मातीच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. हा उपक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि इतर संबंधित विभागांच्या सहकार्याने संयुक्तपणे राबविण्यात येत आहे.

पुणे विमानतळ रस्त्यावरचा वाहतुकीचा प्रश्न आता लवकरच सुटणार; प्रशासनाकडून उचलले जाणार ‘हे’ महत्त्वपूर्ण पाऊल

मनाची मशागत : IPH च्या सहकार्याने शेतकऱ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी एक विशेष उपक्रम आयोजित करत आहे. यात शेतकरी समुदायासमोरील ताणतणाव, भावनिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल. तज्ञांशी संवाद आणि मार्गदर्शनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक निरोगी व संतुलित जीवन जगता यावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

मधमाशीशी मैत्री : मधमाशा शेतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. प्रभावी परागीकरणासाठी मधमाश्यांची संख्या वाढणे अत्यावश्यक आहे. ‘बसवंत हनीबी पार्क अँड ट्रेनिंग सेंटर’ यांच्या सहकार्याने परागीकरणाचे महत्व आणि आणि मधमाशांना अनुकूल अशा शेती पद्धतींची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते.

प्रदर्शकांना आणि अभ्यागतांना व्यावसायिक चर्चा करण्यासाठी बिझनेस लाउंजची व्यवस्था करण्यात आली आहे. यातून कृषी व्यावसायिकांना सहयोग आणि भागीदारींसाठी प्रोत्साहन मिळेल. आंतरराष्ट्रीय उत्पादने आणि व्यवसायाविषयी जाणून घेण्याची संधी अभ्यागतांना मिळेल. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहिती kisan.in या संकेतस्थळावर मिळेल.

 

Web Title: Kisan agri expo begins in moshi 600 companies on 30 acres massive farmer participation expected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:59 PM

Topics:  

  • Agricultural News
  • Farmers News
  • maharashtra farmers

संबंधित बातम्या

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर
1

India-US Trade Deal: अमेरिकन शेती उत्पादनांसाठी भारताची आतापर्यंतची ‘बेस्ट ऑफर’..; जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.