Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; बाधित शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर…

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता महसूल विभागाला याबाबत विचारून घ्यावे. सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये त्यांच्या पैशाला आम्ही बोलणार नाही. आमची जमीन आम्ही देणार नाही, असा अवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 02, 2025 | 06:19 PM
Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; बाधित शेतकऱ्यांनी थेट तहसीलदार कार्यालयावर…
Follow Us
Follow Us:

कागल: सरकारने कोणाचीही मागणी नसताना ८६ हजार कोटी रुपयांचा शक्तिपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला आहे. या मार्गात शेतकऱ्यांची २८ हजार हेक्टर शेती बाधित होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन रस्त्याखाली गाडून शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. या मागणीसाठी कागल तालुक्यातील  बाधित शेतकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढला.

बुधवारी दुपारी बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चेकरांच्या हातात शक्तिपीठ विरोधी तसेच शासनाच्या निषेधाचे फलक घेतले होते. प्रचंड घोषणाबाजी करत हा विराट मोर्चा तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आणण्यात आला. यावेळी माजी आमदार संजय घाटगे म्हणाले, अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तिपीठ समर्थनार्थ एक हजार शेतकऱ्यांनी सह्या दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. परंतु कागल तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी या शक्ती महामार्गाच्या विरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे हरकती दिल्या होत्या. त्याच्याच झेरॉक्स प्रति तहसीलदारांना देण्यासाठी आणि या महामार्गाला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अमरीश घाटगे म्हणाले शासनाने अंबाबाई तुळजाभवानी यासह इतर सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार करावा त्यामुळे रोजगार उत्पन्न होईल. देवाच्या नावावर शक्तिपीठ महामार्ग करण्यास आमचा विरोध आहे. या मार्गाची शेतकऱ्यांवर जबरदस्ती झाल्यास शेतकऱ्यांना जनावरांचे लोढणे हातात घ्यावे लागेल, तालुक्यातील एक इंच ही जमीन आम्ही देणार नाही. कॉम्रेड शिवाजी मगदूम म्हणाले शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील हरकती आम्ही तहसीलदारांना दिले आहेत.

Shaktipeeth ExpressWay: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; तब्बल 12 हजार शेतकरी उचलणार ‘हे’ पाऊल

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता महसूल विभागाला याबाबत विचारून घ्यावे. सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये त्यांच्या पैशाला आम्ही बोलणार नाही. आमची जमीन आम्ही देणार नाही. शरद पवार पक्षाचे शिवानंद माळी म्हणाले, कागलचे लोकप्रतिनिधी आमदार हसन मुश्रीफ म्हणाले होते शक्तिपीठ महामार्ग झाला तर मला राजीनामा द्यावा लागला तरी चालेल परंतु मी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहीन. हे स्पष्ट करत शक्तिपीठ महामार्ग सांगली पर्यंत आला तर कोल्हापूर जिल्ह्यात त्याला ताकतीने विरोध करू.

यावेळी विजय देवणे, सागर कोंडेकर ,पूजा मोरे ,उमा पाटील,  सुरेखा पाटील,गिरीश फोंडे, शिवाजी कांबळे, सम्राट मोरे, यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मागणीचे निवेदन आणि बाधित शेतकऱ्यांच्या प्रांताधिकारी यांना दिलेल्या हरकतीच्या झेरॉक्स प्रति महिलांच्या हस्ते तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आल्या. मान. पुजा मोरे (सरपंच व्हन्नुर)  दादासो पाटील ,आनंदा पाटील ,युवराज कोईगडे एम. पी. पाटील ,योगेश कुळवमोडे,बाळु पोवार  सागर पाटील ,श्रीकांत चव्हाण,आनंदा डाफळे अशोक पाटील,बी.जी पाटील,अमित पाटील  बाळासाहेब कपले,सुरेश संकपाळ आदींसह तालुक्यातील बाधित अबाल वृद्ध शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Kolhapur and kagal farmers against thr shaktipeeth expressway project develop by maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 06:19 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • kolhapur
  • Shaktipeeth Expressway

संबंधित बातम्या

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
1

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
2

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
3

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
4

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.