Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Maharashtra Drought : राज्यात दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडल्याचा दावा करत रोहित पवारांनी बीडमधील मोर्चातून सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे. 10-12 दिवसांत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

  • By विवेक
Updated On: Sep 24, 2026 | 04:27 PM
Rohit Pawar Beed Drought

Rohit Pawar Beed Drought

Follow Us
Follow Us:
  • बीडमधील मोर्चातून रोहित पवारांनी सरकारला 10-12 दिवसांचा अल्टिमेटम दिला.
  • दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसानभरपाई आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी.
  • सोयाबीनचा भाव, वाढता उत्पादन खर्च, पीक विमा आणि कर्जमाफीवरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा.
 

Maharashtra Drought : राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र आहे. अनेक भागांत सोयाबीनसह इतर पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशः संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने आता सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दुष्काळाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधकांसोबतच सत्ताधारी नेतेही शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शेतकऱ्यांच्या भेटी घेत परिस्थितीची पाहणी केली आहे. मात्र, राज्यात अद्याप अधिकृत दुष्काळ जाहीर झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल’

गुरुवारी बीडमध्ये आयोजित मोर्चादरम्यान आमदार रोहित पवार यांनी सरकारला थेट अल्टिमेटम दिला. शेतकऱ्यांच्या बाजूने पुढील 10 ते 12 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Uddhav Thackeray On Maharashtra Drought: अधिसूचना ठीक, पण पंचनामे कधी? दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा थेट सरकारला सवाल

‘तुम्ही पुढच्या दहा-बारा दिवसांत शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतले नाही, तर सरकारला हे महागात कसं पडेल, आम्ही घोषणा करणार आहोत,’ असं रोहित पवार म्हणाले.

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित केला. कर्जमाफीपासून मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहिल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय शेतकऱ्यांना मदत, रोजगार आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असल्याचं त्यांनी सांगितलं.

सोयाबीनच्या भावावरूनही सरकारला सवाल

रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे खतांसह शेतीचा खर्च वाढल्याचं त्यांनी म्हटलं. दुसरीकडे, उत्पादनाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं असल्याचं ते म्हणाले.

लाईव्ह |📍बीड | शेतकरी आक्रोश मोर्चा 24-09-2026 https://t.co/3cWEAX4vJ1 — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2026

सोयाबीनचा भाव टिकवण्यासाठी यापूर्वी निर्यातीचे निर्णय घेतले जात होते, असा संदर्भ देत त्यांनी सध्याच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केला. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासोबतच त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी सरकारने ठोस निर्णय घ्यायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, सरसकट नुकसान झाल्याचं सरकारकडून सांगितलं जात असेल, तर सरसकट नुकसानभरपाई देण्यात अडचण काय, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. आता पुढील काही दिवसांत सरकार दुष्काळ आणि शेतकरी मदतीबाबत काय निर्णय घेतं, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Web Title: Maharashtra drought rohit pawar ultimatum maharashtra farmers beed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 04:27 PM

Topics:  

  • Beed News
  • CM Devendra Fadnavis
  • drought news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या
2

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
3

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा
4

Buldhana: दुष्काळाच्या झळा, मदतीकडे डोळा; पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात, शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची अपेक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.