Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह भाषेत वक्तव्ये केली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 18, 2025 | 08:26 PM
Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Prashant Koratkar: प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळला; कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूरच्या कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र कोल्हापूर कोर्टाने प्रशांत कोरटकरचा जामिन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.

प्रशांत कोरटकरच्या जामिन अर्जावर सुनावणी करताना कोर्टाने सरकारी वकील आणि फिर्यादीची विनंती मान्य केली.  काल या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली होती. दरम्यान कोर्टाने आज आपला निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार कोर्टाने प्रशांत कोरटकरला जामिन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे कोरटकरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून प्रशांत कोरटकर याला अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र हा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे. राज्यभरामध्ये कोरटकर विरोधात आक्रमक पवित्रा घेण्यात आला असून विरोधकांनी देखील टीकेची झोड उठवली आहे. कोरटकर याचा वक्तव्यामुळे त्याचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती. राज्यातील वाढत्या रोषामुळे राज्य सरकारला देखील याबाबत कठोर पावले उचलावी लागली आहेत. राज्य सरकारने जामीन रद्द करावा यासाठी याचिका केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली आहे.

Prashant Koratkar case : प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून झटका; जामीन रद्द होऊन अटक होणार का?

त्यानंतर वकील असीम सरोदे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की “कोरटकरची भाषा असभ्य, आक्षेपार्ह व क्रूर होती. त्याची भाषा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारी व जातीय तेढ निर्माण करणारी होती. राज्य सरकारकडून कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला. तो अर्ज लगेच मान्य करुन न्यायालयाने त्याला जामीन दिला. हा निकाल देत असताना सरकारी पक्षाची आणि पोलिसांची बाजू जाणून घेतली नाही. इंद्रजित सावंत यांची काय बाजू आहे? हे ऐकून घेतलं गेलं नाही. एकतर्फी बेकायदेशीर पद्धतीने आदेश देण्यात आला होता,” असे मत असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

पुढे ते म्हणाले की, “मुंबई न्यायालयाने याची गंभीर दखल घेऊन कायद्याची बाजू लक्षात घेऊन याची कोल्हापूर न्यायालयामध्ये सुनावणी झाली पाहिजे. कोल्हापूरला याची दुपारी सुनावणी आहे. प्रशांत कोरटकर सारख्या व्यक्तीला संरक्षण देताना कोर्टाने कोणत्या गोष्टींचा विचार केला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोर्टाने टाकलेल्या अटी सुद्धा त्याने धुडकावून लगावल्या आहेत. सुरक्षित जागा शोधण्यासाठी तो सगळीकडे फिरतो आहे यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची बदनामी होत आहे. महाराजांबाबत काहीही बोललं तरी चालेल त्या माणसाला संरक्षण मिळत आहे असं चित्र राज्यामध्ये निर्माण व्हायला नको,” असे स्पष्ट मत इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Kolhapur court denied prashant koratkar interim bail petition controversial statement about chatrapati shivaji maharaj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2025 | 08:11 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • crime
  • kolhapur
  • Prashant Koratkar

संबंधित बातम्या

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली
1

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन,  तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर
2

‘माझ्या रूमवर ये, मी तुला परदेशात घेऊन जाईन, तुला एक पैसाही खर्च येणार नाही…’ स्वामी चैतन्यनंद यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर

Badlapur News: बदलापूरमधील पोलिसाचाच मेल हॅक; ऑनलाईन फसवणुकीत तब्बल 13 लाखांचा गंडा, लाखांचं लोनही काढलं
3

Badlapur News: बदलापूरमधील पोलिसाचाच मेल हॅक; ऑनलाईन फसवणुकीत तब्बल 13 लाखांचा गंडा, लाखांचं लोनही काढलं

Pune Crime:  कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण; नंतर इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये…
4

Pune Crime: कामावरून काढल्याचा बदला! २ मजुरांनी ठेकेदाराच्या ३ वर्षीय मुलीचं अपहरण; नंतर इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.