Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur local elections: कोल्हापूर स्थानिक निवडणुका: नगरपालिका निवडणुकीत घराणेशाही व गटबाजीचा प्रभाव वाढला

एकंदरीत, पक्षांची चिन्हे बाजूला पडून स्थानिक आघाड्यांची मोहर उमटलेली ही निवडणूक पूर्णपणे गावकुसातील राजकारणाच्या नव्या समीकरणांची कहाणीने निवडणूक रंगणार आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 28, 2025 | 09:57 AM
Kolhapur local elections,

Kolhapur local elections,

Follow Us
Close
Follow Us:
  • प्रत्येक ठिकाणी गटबाजी, स्थानिक घराणेशाही
  • चिन्ह न बदलता उमेदवार शोधण्याचे मतदारांसमोर आव्हान
  • विचारधारेवर नव्हे, तर वैयक्तिक समीकरणांवर भर
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. प्रत्येक ठिकाणी गटबाजी, स्थानिक घराणेशाही आणि वैयक्तिक संबंधांवर आधारित आघाड्या उभ्या राहत असून या सर्वांमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची अधिकृत चिन्हे जवळजवळ गायब झाली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये प्रमुख पक्षांचे झेंडे, गाणी, प्रचार साहित्य आणि प्रतीके गाजत असतात; मात्र स्थानिक निवडणुकीत हीच पक्षनिष्ठा कमी होऊन पूर्णपणे स्थानिक आघाड्यांच्या रंगाने रंगलेली दिसत आहे.

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

या निवडणुकीत मोठ्या पक्षांच्या नेतृत्वांनी गाठीभेटी, समन्वयक बैठकांचा कितीही आग्रह धरला, तरी उमेदवार मात्र आपल्या गावातील समीकरण पाहूनच निर्णय घेताना दिसत आहेत. मागील काही दिवसांत जिल्ह्यातील बहुतेक नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे. कुठे दोन गट एकत्र आले तर कुठे तीन गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते एकाच पॅनेलमध्ये एकत्र आले आहेत, तर काही ठिकाणी त्याच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध जोरदार टक्कर देताना दिसत आहेत.

पक्षांची चिन्हे नसल्याने वयोवृद्ध आणि ग्रामीण भागातील मतदार गोंधळले असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याउलट तरुण मतदार आणि प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांमध्ये या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. ते पक्षापेक्षा उमेदवारांच्या कामगिरीला प्राधान्य देत असून ‘कोण काम करणार?’ हा मूलभूत प्रश्न विचारत आहेत. सोशल मीडियावरही प्रचाराला मोठे महत्त्व मिळत असून व्हिडिओ, पोस्टर्स, पॅनेलची जाहिरात मोठ्या प्रमाणात फिरत आहे.

मोठी बातमी ! जम्मूतील मोठा दहशतवादी कट उधळला; 19 वर्षीय संशयित दहशतवादी अटकेत

नव्या पिढीसोबत अनुभवी माजी नगरसवेकांचा मेळ जमल्याने यंदाची निवडणूक चुरशीची

जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक प्रभागांत तिरंगी आणि काही ठिकाणी चौकोनी लढतींचे स्वरूप दिसत आहे. स्थानिक आघाड्या, नवी तरुण मंडळी आणि अनुभवी माजी नगरसेवक यांचा मेळ जमल्याने ही निवडणूक चुरशीची अशा स्थानिक चिन्हांवर मोहर उमटवताना त्यांच्या मागच्या उमेदवारांच्या ताकदीचा अंदाज बांधणे हाच खरी कसोटीचा क्षण ठरणार आहे. एकंदरीत, पक्षांची चिन्हे बाजूला पडून स्थानिक आघाड्यांची मोहर उमटलेली ही निवडणूक पूर्णपणे गावकुसातील राजकारणाच्या नव्या समीकरणांची कहाणीने निवडणूक रंगणार आहे.

चिन्ह न बदलता उमेदवार शोधण्याचे मतदारांसमोर आव्हान

लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत कमळ, पंजा, धनुष्य-बाण, मोर, घड्याळ यांसारखी चिन्हे ठळकपणे झळकतात. मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत या चिन्हांना स्थान नसल्याने मतदारांना आता ‘सायकल’, ‘बाटली’, ‘दिवा’, ‘कुंडी’, ‘टेबल’, ‘खुर्ची’ अशा विविध निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हांवर नजर ठेवावी लागली आहे. पक्षनिष्ठ मतदारांनाही आता ‘पक्ष नाही तर उमेदवार’ असा विचार करावा लागत असून चिन्ह न बदलता उमेदवार शोधण्याचे आव्हान मतदारांसमोर उभे ठाकले आहे.

Maharashtra Politics : राजकीय पक्षांचे चिन्हच झाले गायब; स्थानिक आघाड्यांच्या चिन्हावरच लागली मोहर

विचारधारेवर नव्हे, तर वैयक्तिक समीकरणांवर भर

जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी विकासकामे, पाणी योजना, रस्ते, ड्रेनेज, गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर या निवडणुकांची लढाई केंद्रीत झाली आहे. पक्षीय घोषणापत्रांपेक्षा उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, स्थानिक पातळीवरील कामे, कुटुंबाची ओळख आणि त्यांचा परिसरातील प्रभाव अधिक महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे अनेक दशकांपासून एखाद्या पक्षाशी निष्ठा ठेवणारे कार्यकर्ते सुद्धा या वेळी वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये सामील झाले आहेत. काही ठिकाणी तर परंपरागत प्रतिस्पर्धी आता एकाच पॅनेलमध्ये उभे राहून ‘एकदिलाने सत्ता स्थापन’ करण्याचे प्रयत्न करताना दिसतात. विचारधारेवर नव्हे, तर वैयक्तिक समीकरणांवर भर अधिक आहे.

 

Web Title: Kolhapur local elections the influence of nepotism and factionalism increased in the municipal elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 09:56 AM

Topics:  

  • Kolhapur Politics
  • Local Body Election 2025

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.