Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : स्थानिक रोजगाराला मिळणार चालना; ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

सातारा आणि कोकण या समृद्ध इतिहास व नैसर्गिक वैभव लाभलेल्या प्रदेशांना एकत्र जोडणारे पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी कोल्हापूर फर्स्टने पुढाकार घेत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2026 | 01:08 PM
Kolhapur News : स्थानिक रोजगाराला मिळणार चालना; ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक रोजगाराला मिळणार चालना
  • ‘पर्यटन सर्किटला’ केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद
कोल्हापूर/ अहिल्या परकाळे : सातारा आणि कोकण या समृद्ध इतिहास व नैसर्गिक वैभव लाभलेल्या प्रदेशांना एकत्र जोडणारे पर्यटन सर्किट विकसित करण्यासाठी कोल्हापूर फर्स्टने पुढाकार घेत केंद्रीय पर्यटनमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. प्रस्तावित सर्किटमध्ये पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील ऐतिहासिक गड-किल्ले, सांस्कृतिक वारसा आणि प्राचीन धार्मिक स्थळांचा समावेश असणार असून, 1 एप्रिलपासून जाहीर होणाऱ्या नव्या पर्यटन धोरणात कोल्हापूर परिसरातील महत्त्वाच्या स्थळांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. या उपक्रमामुळे कोल्हापूरच्या पर्यटनवृद्धीसह आर्थिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी म्हणून कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. कोल्हापूर जिल्हा जैवविविधतेने नटलेला पश्चिम घाट आहे. करवीर काशी म्हणून असणारे धार्मिक महत्त्व, दोन हजार वर्षांचा प्राचीन इतिहास, राजर्षी शाहूंच्या सामाजिक कार्याचा पुरोगामी वारसा असून, क्रीडानगरी व मराठी चित्रपट, कला पंढरी म्हणून जगभर कोल्हापूरची ओळख आहे.

तांबडा, पांढरा रस्सा अर्थकारणाचा कणा
कोल्हापूरला मोठीच खाद्यसंस्कृती आहे. यामध्ये मिसळ, वडापाव, भडंग, गुळ, ठिकपुलींची बर्फी आदी खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहेत. परंतू कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा जागतिक पातळीवर पोहोचला आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेले, तरी कोल्हापूर सारखा तांबडा, पांढरा रस्सा बनणे शक्य नाही, कारण कोल्हापूरच्या पाण्यामध्ये वेगळीच चव असल्याने हा तांबडा पांढरा रस्सा फक्त कोल्हापुरातच चविष्ट बनू शकतो. त्यामुळे खाद्य संस्कृतीमध्ये अर्थकारणाचा मुख्य कणा हा तांबडा पांढरा रस्सा असेल, यात शंका नाही.

कोल्हापुरी चप्पल आणि फेटा जगभर प्रसिद्ध
कोल्हापूरची चप्पल, फेटा जगभर प्रसिद्ध असून मागणी जास्त आहे. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल विक्रीला चालना मिळाली, तर येथील व्यवसायिकांना चांगलीच मदत होणार आहे. तसेच परंपरेपासून चमडे कमवून कोल्हापुरी चप्पल तयार करणाऱ्या नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच कोल्हापुरी चप्पलला मोठे मार्केट मिळेल.

शेकडो वीरगळ, स्त्रीशक्तीची साक्ष देणाऱ्या सतीशिळा
इतिहासाची महती सांगणारे शेकडो वीरगळ, विविध कालखंडातील वीरांची समाधी, स्त्रीशक्तीची साक्ष देणाऱ्या सतीशिळा, शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारी पावनखिंड, पन्हाळगड व विशाळगडावरील स्मारके, गडहिंग्लज नेसरी खिंडीतील प्रतापराव गुजर व त्यांच्या शिलेदारांचे स्मारक, पन्हाळगडावरील रामचंद्र पंत अमात्य स्मारक, पंचगंगा नदी काठावरील छत्रपतींची स्मशानभूमि (संस्थान शिवसागर) अशा अनेक ऐतिहासिक व्यक्तीमत्वांची स्मारक कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत.

मसाई पठार ठरतेय मुख्य आकर्षण
पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात असलेल्या कुशीरे-पोहाळे येथील पांडव लेणी, मसाई पठार परिसरातील बौध्द लेणी पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. एवढेच नाही तर बौद्ध भिकूसह, संशोधक बौद्ध लेण्यांचा अभ्यास करीत असतात. तसेच मसाई पठार येथे चित्रपट निर्मितीही करण्याची परंपरा आहे. चित्रपट निर्मितीसाठी हा परिसर अतिशय योग्य मानला जातो. तसेच येथे पावसाळ्यात रंगीबेरंगी फुलांची चादर पसरलेली असते. त्यामुळे ही जैवविविधता राहण्यासाठीही अभ्यासक येत असतात. मसाई पठार पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे.

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा पण… पालकमंत्र्यांनी नागरिकांना केलं आवाहन

कोल्हापुरातील धार्मिक महत्त्वाची स्थळे
करवीर निवासिनी अंबाबाई, दख्खनचा राजा जोतिबा, नृसिंहवाडी या देवस्थानच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात. अंबाबाईंच्या दर्शनाला सुट्टीच्या दिवशी किमान एक लाख तर नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस दोन लाखापर्यंत भाविक दर्शन घेत असतात. याशिवाय खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, टेंबलाई मंदिर, कात्यायनी, नवदुर्गा, नृसिंहवाडी, आदमापूर, कसबा बीड येथील महादेव मंदिर, आदी धार्मिक स्थळे सुट्टीच्या दिवशी भाविकांनी फुलून गेलेली असतात. पर्यटन सर्किट झाल्यानंतर कोल्हापूरला पर्यटक येण्याच्या संख्येत वाढ होईल. परिणामी कोल्हापूरचे अर्थकारण सुधारण्यास मदत होणार आहे.

Sangali News : वाहतूक कोंडीने जनजीवन विस्कळीत; प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप

Web Title: Kolhapur news local employment will get a boost central governments positive response to tourism circuit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • kolhapur news
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा
1

Ratnagiri : दोन महिने रिक्षा व्यावसायिकांसाठी सुगी मात्र CNG तुटवड्याने व्यवसायावर गदा

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स
2

Vasai News : पशुसेवा करणारे हात फार कमी त्यासाठीच ॲनिमल ॲम्ब्युलन्स

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक
3

Chiplun : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन
4

Satara News : शिवभक्तांसाठी मोठी बातमी ; दक्षिण काशी वाईमध्ये लघु कुंभ मेळाव्याचे आयोजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.