Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : नव्या आयुक्तांसमोर भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान; वाढत्या 19 निलंबित कर्मचारी

महापालिकेसमोर वाढती पाणीटंचाई आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांची प्रमुख आव्हाने आहेत. शहराचा विकास, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि पाणीपुरवठा वसुली करणे कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत होत असलेला भ्रष्टाचार नगरसेवकांनी समोर आणला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 06, 2026 | 05:56 PM
Kolhapur News : नव्या आयुक्तांसमोर भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान; वाढत्या 19 निलंबित कर्मचारी
Follow Us
Follow Us:
  • नव्या आयुक्तांसमोर भ्रष्टाचार रोखण्याचे आव्हान;
  • वाढत्या 19 निलंबित कर्मचारी
कोल्हापूर/आहिल्या परकाळे : महापालिकेसमोर वाढती पाणीटंचाई आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांची प्रमुख आव्हाने आहेत. नवीन आयुक्त शहराचा विकास, रखडलेले प्रकल्प पूर्ण करणे आणि घरफाळा व पाणीपुरवठा वसुली करणे ही महत्त्वाची जबाबदारी कशी सांभाळणार, कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत होत असलेला भ्रष्टाचार नगरसेवकांनी नुकत्याच झालेल्या सभागृहात समोर आणला आहे. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी नूतन आयुक्त कशाप्रकारे प्रयत्न करणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. गेली 5 वर्षे प्रशासक राजवटीत अधिकाऱ्यांनी महापालिकेला भिकेला लावले आहे. सर्वच कर्मचारी आणि अधिकारी लाखो रुपये पगार, फिरायला गाडी, सर्व सोयी सुविधा घेऊन सुस्तावले आहेत, असा घणाघाती आरोप नगरसेवकांनी केला आहे. नगरसेवक, नागरिकांच्या समस्या आठ दिवसांत पूर्ण केल्या पाहिजेत.

कोल्हापूर शहरातील अनेक शासकीय कार्यालय आणि अधिका-यांच्या निवासस्थानावरील पाणीबिल आणि घरफळा गेल्या अनेक वर्षापासून भरलेला नाही. कोट्यावधीची रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे. नूतन आयुक्त या वसुलीबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे सूचना देतात याकडे सभागृहाचे लक्ष लागले आहे.

सह्याद्रीचा नवा राजा: ‘राणोजी’! राधानगरीच्या जंगलात नव्या नर वाघाची एन्ट्री; एक जबदस्त झलक

घरबसल्या दिले जाते लाखो रुपयांचे वेतन
तसेच 19 कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडल्याने निलंबित केले आहे. त्यांची अनेक वर्षांपासून चौकशी सुरू आहे, घरी बसून त्यांना 1 लाख 68 हजार रुपये वेतन घेतात. घरबसल्या लाखो रुपये वेतन मिळतेय म्हणूनच लाच घेण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना भीतीच उरलेली नाही. या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या आरोपाचे उत्तर देण्याची जबाबदारी नूतन आयुक्तांवर आलेली आहे. नूतन आयुक्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कशाप्रकारे जरब बसवणार, याकडे संपूर्ण सभागृहास ह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Satara News : कराड-चिपळूण महामार्गाच्या कामाला वेग; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची मागणी

आर्थिक अडचण सोडवण्यासाठी उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा
प्रशासकराज कालावधीमध्ये महापालिकेने अनेक प्रकल्प पूर्ण केले नाहीत. त्याचबरोबर घरफाळा, पाणीबिल, गुंठेवारी आदी बिलांमध्ये मनमानी कारभार झाला आहे. सभागृह आल्यानंतर मात्र अधिकारी आणि कर्मचारी जागे झाले आहेत.बिलांमध्ये वाढ करून नगरसेवकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यामुळेच बिलवाढीला नगरसेवकांनी विरोध केला. प्रशासकराज कालावधीमध्ये महापालिका आर्थिक अडचणीत आली आहे. महापालिका ड वर्गातून अ वर्गात आणायच्या महापौर यांच्यासह संपूर्ण सभागृहाचा मानस आहे. त्यामुळेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बिल वसूलीसह उत्पन्नाचे स्त्रोत वाढवले पाहिजेत, अशा सूचना महापौर रुपाराणी निकम यांनी दिल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत वाढवणे सुद्धा मोठे आव्हान आहे.

पाटबंधारे खात्याचे थकित बिलाचा प्रश्न
पंचगंगा नदीतून हे पाणी उपसा केला. परंतु कोल्हापूर महापालिकेकडे 2011 पासून जलसिंचन विभागाचे पाणी बिल जवळपास 70कोटीच्या घरात थकले आहे. परिणामी पाटबंधारे विभागाने नागदेववाडी व बालिंगा येथे पंपींग हाऊसला टाळे ठोकले होते. अ‍ॅक्शनला रिएक्शन म्हणून महापालिकेने पाटबंधारे विभागाचे कार्यालय सील केले. यामध्ये चक्क मंत्री, आमदार, खासदारांनी लक्ष घातल्याने तात्पुरता तोडगा निघाला आहे. परंतु हे थकित बिल भरण्याचे नूतन आयुक्तांसमोर मोठे आव्हान आहे.

Web Title: Kolhapur news new commissioner faces challenge of preventing corruption 19 suspended employees on the rise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?
1

The Odyssey OTT Release: सिनेमाप्रेमींसाठी मोठी अपडेट! क्रिस्टोफर नोलनचा चित्रपट कधी आणि कुठे पाहाल?

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट!  Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड
2

Netflix Top 10 Movies Today: OTT प्रेमींसाठी मोठी अपडेट! Netflixवर आज जलवा? ‘Cocktail 2’पासून ‘Peddi’पर्यंत टॉप १० चित्रपट ट्रेंड

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा
3

The Exorcist Movie: दोन मुली गायब… आणि सुरू होतो रहस्यमय खेळ! ७१ मिनिटांचा हा भयपट विकेंडला नक्की पाहा

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर
4

LIC Jeevan Umang Plan : कमाल…एलआयसीची ‘ही’ पॉलिसी ऐकली का? दरमहा 5000 गुंतवणुकीवर मिळणार 100 वर्षांपर्यंतचे लाइफ कव्हर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.