Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली 'तारा' ही वाघीण आपल्या अचाट साहसामुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 29, 2025 | 01:07 PM
Kolhapur News : अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्…. तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा
Follow Us
Follow Us:
  • अवघ्या 45 मिनिटांत दीड किलोमीटर पोहत गेली अन्….
  • तारा वाघिणीने दिला मगरीला चकवा
  • व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात ताराची ऐतिहासिक नोंद
कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात नुकतीच सोडण्यात आलेली ‘तारा’ ही वाघीण आपल्या अचाट साहसामुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. वाघीण कुणाला घाबरत नसते; तिची डरकाळी आणि जबडा पाहताच अनेकांची घाबरगुंडी उडते. मात्र, यावेळी ताराने केवळ आपल्या ताकदीचेच नव्हे, तर बुद्धिमत्ता, धैर्य आणि जिवंत राहण्याच्या वृत्तीचेही दर्शन घडवले. तिच्या या साहसाने वनविभागाचे अधिकारी, तज्ज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक थक्क झाले असून व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासात तिच्या नावाची ऐतिहासिक नोंद झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे संचार करण्यासाठी ताराला जंगलात सोडण्यात आले होते.

प्रारंभी तिच्या हालचालींवर वनविभागाचे पथक बारकाईने लक्ष ठेवून होते. दरम्यान, वारणा धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तिचा प्रवेश झाला. हा परिसर मगरींच्या वावरासाठी ओळखला जातो. मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा, खोल पाणी आणि मगरींचा धोका पाहता हा भाग कोणत्याही वन्यप्राण्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. अशा परिस्थितीत ताराने घेतलेला निर्णय सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा ठरला. वारणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तिने तब्बल दीड किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत न थांबता पोहत पार केले. या संपूर्ण घटनेदरम्यान वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची धाकधूक वाढली होती. जीपीएस कॉलरच्या माध्यमातून तिच्या हालचालींचे निरीक्षण सुरू होते.

Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त

इतिहासातील प्रेरणादायी अध्याय

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, वाघ सहसा मोठ्या जलाशयातून लांब पल्ल्याचे पोहणे टाळतात. मात्र, योग्य परिस्थितीत आणि गरज भासल्यास वाघ उत्कृष्ट पोहणारे प्राणी असल्याचे ताराने सिद्ध केले, मगरीचा धोका असतानाही तिने दाखवलेले धैर्य आणि शारीरिक क्षमता दुर्मिळ मानली जात आहे. ताराच्या या साहसामुळे सहाादी व्याघ्र प्रकल्पातील व्याघ्र संवर्धन प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली आहे. जंगलात मुक्तपणे वावरणाऱ्या वाघिणीची ही घटना मानवी हस्तक्षेपाशिवाय निसर्गात जगण्याची ताकद दाखवणारी ठरली आहे. ताराचे हे थरारक साहस केवळ एक घटना न राहता, व्याघ्र संवर्धनाच्या इतिहासातील प्रेरणादायी अध्याय म्हणून कायम स्मरणात राहणार आहे.

धरणातून झोंळबी पारिक्षेत्रात प्रवेश

सह्यादी व्याघ्र प्रकल्पात ताडोबा येथून आणलेल्या ‘तारा’ला ९ डिसेंबर रोजी सहह्यादी व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. १८ डिसेंबरला ती विलग्न वासाच्या पिंजऱ्यातून बाहेर पडून अधिवासाच्या शोधात बाहेर पडली, १९ डिसेंबर रोजी चांदोली वनक्षेत्रातील वारणा धरणाच्या बैंकवॉटरपाशी ती आली. त्याठिकाणी ती बराच वेळ बसली, सायंकाळी सहा वाजता तिने धरणाच्या पाण्यात उडी मारली. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्याऱ्यांना वाटले काहीवेळ पाण्यात राहिल, मात्र तारा थाबलीच नाही, दोनशे मीटर गेल्यावर तिने डाव्या बाजूला वळून झोळवी परिक्षेत्रात प्रवेश केला.

शिकारीच्या शोधात धाडसी प्रवास

जंगल क्षेत्रात वनविभागाने नुकतेच १०० चितळ सोडले आहेत, त्यांच्या आवाजामुळे तारा या शिकारीच्या क्षेत्राकडे आपल्या हद्दीचा अंदाज घेण्यासाठी ताराने हा धाडसी प्रवास केला. या भागात सोडलेल्या चितळांचा वावर आणि चंदा वाघिणीच्या खुणा यामुळे ती भक्ष शोधण्यासाठी या परिसरात आली असावी. तिच्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे, असे तुषार चव्हाण क्षेत्रसंचालक, सह्यादी व्याघ्र राखीव प्रकल्प यांनी सांगितले.

प्रत्येक हालचालीची होतेय अचूक नोंद

वारणा धरणाच्या या क्षेत्रात मोठ्या मगरींची संख्या जास्त असल्याने वनविभागाच्या मनात तिच्या सुरक्षिततेबाबत धाकधूक होती. मात्र, ताकदवान ताराने सर्व संकटांवर मात करत झोळंबी परिक्षेत्रात यशस्वी प्रवेश केला. विशेष म्हणजे, तिच्या गळ्यातील रेडिओ कॉलर पाण्याखाली असतानाही उत्तमरीत्या काम करत होती, ज्यामुळे वनविभागाला तिच्या प्रत्येक हालचालीची अचूक नोंद घेता आली. ताराने पाणी पार केल्यानंतर केवळ विश्रांती घेतली नाही, तर त्याच रात्री झोळंबी कोअर झोनमध्ये शिकारही केली. सध्या तिचे वास्तव्य ढेबेवाडी बफर झोनमध्ये आहे.

Krushnraj Mahadik News: कृष्णराज महाडिकांचा ‘यू टर्न’, २४ तासांत माघार! कोल्हापुरात महायुतीत वादाची ठिणगी

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: तारा वाघीण सध्या चर्चेत का आहे?

    Ans: तारा वाघिणीने वारणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तब्बल दीड किलोमीटर अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पोहत पार केले, तेही मगरींचा धोका असलेल्या परिसरातून. हे साहस अत्यंत दुर्मिळ आणि थरारक असल्याने ती चर्चेत आहे.

  • Que: तारा वाघीण कुठून आणण्यात आली आहे?

    Ans: ताराला ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले आहे.

  • Que: ताराला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कधी सोडण्यात आले?

    Ans: ताराला ९ डिसेंबर रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Web Title: Kolhapur news she swam one and a half kilometers in just 45 minutes and tara the tigress gave the crocodile a fright

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 01:07 PM

Topics:  

  • kolhapur
  • Tiger Project

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
3

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.